मरपली उप पोलीस ठाण्यात तीन दिवशीय शिबीर पोलीस प्रशासनाचा पुढाकार शेकडो नागरिकांचं लाभ

116

 

रमेश बामनकर /अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- अहेरी तालुक्यातील अति दुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रातील उप पोलीस स्टेशन मरपली व गडचिरोली पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रभारी अधिकारी ए.के.मुल्ला सा.यांच्या मार्गदर्शनाखाली मरपली ठाण्याच्या आवारात आयुष्यमान भारत कार्ड(स्मार्ट कार्ड),पॅन कार्ड काढण्याचे तीन दिवशीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
मरपली हा परिसर अति दुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असून या परिसरात कुठेही सेतु केंद्र नसल्याने तालुका स्थळी जाऊन आयुष्यमान भारत कार्ड(स्मार्ट कार्ड),पॅन कार्ड काढावे लागतो.परिणामी नागरिकांना शारीरिक त्रास व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे आणि,पॅन कार्डबँकेत शासकीय कामात सक्तीचे असल्याने त्रास सहन, आर्थिक बुर्धडं सहन करून काढावेच लागत आहे. ही बाब पोलीस विभागाने लक्षात घेऊन मरपली उप पोलीस ठाण्यात नागरिकांचे , स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी तीन दिवशीय शिबिर घेण्यात आले आहे, हद्दीतील शेकडो नागरिक यांचा लाभ घेतले आहे.या करिता सेतू केंद्र चालक कमलापूर येथील श्रीधर दुग्गीरालापाठी व वैष्णवी श्रीधर दुग्गीरालापाठी यानी मोलाचे सहकार्य केले तसेच उप पोलीस स्टेशन मरपली चे उप पोलीस निरीक्षक व जिल्हा पोलीस अमलदार वर्ग सहकार्य केले आहे.