Home नागपूर महादुला कोरोना चा हाँट स्पाँट? आज पुन्हा ५ जण कोरोना पाँजिटीव...

महादुला कोरोना चा हाँट स्पाँट? आज पुन्हा ५ जण कोरोना पाँजिटीव आढळले

7001

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर २९ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत सध्या कोरोना चे हाँट स्पाँट बनले आहे. आज दि. २९ जुलै २०२० रोजी ५ जण कोरोना पाँजिटीव आढळले आहेत.
दि. २७ जुलै रोजी येथील कांन्क्टैक्टर असोशियन चा ५० वर्षिय एक पदाधिकारी तथा सिविल कांन्क्टैक्टर चा कोरोना मुळे म्रृत्यु झाला होता. त्यांच्या परिवारातील १०-१२ जणांच्या टेस्ट केल्या गेल्या होत्या. त्यापैकी आज त्यांचा लहान भाऊ वय ४० वर्ष याची रिपोर्ट पाँजिटीव आली आहे. सुत्रांनी माहिती दिली की हा २१० CHP ला ठेकेदारीत लेबर म्हणुन तांदळे ठेकेदाराकडे होता तसेच त्याची बचत गटाच्या तीन साईट कोराडी न्यु प्रोजेक्ट ६६० ला पण सुरु होत्या.. आणि या साईटवर त्याचे नियमित जाणे येणे सुरु होते. तसेच महादुला छिंदवाडा रोडवरील बिल्डिंग मटेरिअल सप्लायर कडे दररोज ची बैठक पण सुरु असायची त्यामुळे त्याच्या संपर्कात भरपूर जण आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. फुले नगर परिसरात पाईपलाईन चे त्याचे काम सुद्धा सुरु होते. त्यामुळे तो येथील इंजिनिअर, कर्मचारी यांचे पण तसेच अध्यक्ष यांचे संपर्कात नेहमी यायचा. आज त्याचा रिपोर्ट पाँजिटीव आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःच्या स्वैब टेस्ट करुन घ्याव्यात अशी विनंती नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याच्या साईटवर काम करणारा ३० वर्षिय युवक रा. ढेंगरे ले आऊट हा सुद्धा पाँजिटीव निघाला आहे.

*इंदिरा प्रगती नगर मध्ये ३ जण पाँजिटीव*

महादुला नगरपंचायत मधील वार्ड क्रमांक ९ मधील इंदिरा प्रगती नगर च्या जुन्या दारु भट्टी पुढे महाजेनको २१० मेगावॉट वीज प्रकल्पातील ५० वर्षिय कामगार यांच्या घरी बिहार पटना येथुन आलेल्या ४ नातेवाईकांपैकी ३ जण हे कोरोना पाँजिटीव निघाले आहेत. असे समजते कि पटना बिहार येथे BRKS कंपनीत कार्यरत ४९ वर्षिय लेबर हे त्यांची दोन मुले २४ वर्षिय दुसरा २३ वर्षिय तसेच त्याचा एक २४ वर्षिय मित्रासह रेल्वे च्या ग्रुप डी भर्तीसाठी रेल्वे स्टेशन ३ दिवसांपूर्वी आलेत तिथे त्यांनी आपले डाक्यूमेंट जमा केले रेल्वे स्टेशन च्या बाजुला असलेल्या एका लाँजवर थांबलेत. त्यानंतर हे चौघेही त्यांचे नातेवाईक यांच्या इंदिरा प्रगती नगर येथील घरी आलेत. तिथे ते बाहेरून आल्याची माहिती मिळताच महादुला नगरपंचायत येथे या चौघांची टेस्ट झाली त्यापैकी तिघांची टेस्ट पाँजिटीव आली तर एक निगेटिव्ह आला.
आज या तिन्ही ठिकाणी महादुला नगरपंचायत चे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार तसेच नगरपंचायत कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आदी पोहोचले. नगरपंचायत कर्मचारी यांनी या पेशंट्स तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची थर्मल स्क्रिनिंग करुन टेंपरेचर काऊंट केले. महादुला नगरपंचायत मधील हे तिन्ही परिसर पुर्णतः सेनिट्राईज केले. सध्या नागपुरात मेयो. मेडिकल आदी शासकीय रुग्णालये, तसेच आमदार निवास, VNIT आदी हाऊसफुल्ल असुन या ठिकाणी आता कोरोना पाँजिटीव पेशंट व कोरोंटाईन पेशंट ची संख्या वाढली आहे. त्यामुळे या नव्या पेशंट्सना कुठे कोरोंटाईन करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पेशंट्सना आरोग्य अधिकारी डॉ. राऊत तसेच तहसीलदार हिंगे यांचे निर्देशानुसार कोरोंटाईन व उपचाराची प्रक्रिया पार पाडली जाईल असे मुख्याधिकारी संदीप छिद्रावार यांनी सांगितले.
कोरोना पाँजिटीव ची संख्या बघता हेल्थ डिपार्टमेंट कडुन पाँजिटीव पेशंट ला त्यांच्या च घरी होम कोरोंटाईन करुन त्यांचे वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन २-३ दा चेकअप करावे असे पण नवीन नियम आले आहेत. त्यामुळे या पेशंटंना त्यांच्या घरीच होम कोरोंटाईन केले जाऊ शकते अशी माहिती पण मिळाली आहे. बातमी लिहीपर्यंत पाँजिटीव पेशंट चे घर सील करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Previous articleकोविड सर्वेक्षणाच्या सरसकट कामातून अंगणवाडी सेविकांना वगळण्याच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल : विष्णू आंब्रे
Next articleकोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी 7 नवीन कोरोना बाधित