राजु तुराणकर यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी तर सागर मुने यांची तालुकाध्यक्षपदी निवड

67

 

विशाल ठोंबरे
दखल न्युज भारत

पुरोगामी पत्रकार संघटना ही केंद्र सरकारच्या नीती आयोग व महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यताप्राप्त पत्रकार संघटना असून,पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी व पुराेगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष मा.नरेंद्र साेनारकर यांच्या एका नियुक्ति पत्रान्वये लोकवाणी जागर,न्यूज पाेर्टल चे मुख्य संपादक व संस्थापक, संचालक तसेच दैनिक बाळकडु चे प्रतिनिधी शिवसेना शहर प्रमुख वणी, माजी नगर सेवक,व धोबी परीट सर्व भाषिक महासंघाचे विदर्भ महासचिव, नगर सेवा स्वच्छता समितीचे सदस्य, वणी फॉर्मस प्रोड्युसर कंपनीचे संचालक राजु किसन तुराणकर यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
तसेच पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी व संघाचे विदर्भ अध्यक्ष मा.नरेंद्र सोनारकर यांच्या सुचनेनुसार यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध, निर्भिड पत्रकार पुराेगामी पत्रकार संघ यवतमाळ चे जिल्हाध्यक्ष राजु तुराणकर यांचे मार्गदर्शनाखाली सागर मुने Am news, न्युज आपली वणी, लोकवाणी उपसंपादक, सागर झेप चे संस्था अध्यक्ष, संस्कार भारती समिती प्रमुख ,नाट्य दिग्दर्शक अभिनेता, जिल्हा युवा व्याखाते इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र यांची पुराेगामी पत्रकार संघाचे वणी तालुका अध्यक्ष पदी म्हनुन निवड करण्यात येत आहे.
या निवडीचे माध्यमातून पत्रकारांची संघटना मजबूत करणे पुरोगामी पत्रकार संघटना ही केंद्र सरकारच्या नीती आयोग व महाराष्ट्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त पत्रकार संघटना असून, जनसामान्यांना न्याय मिळवून देणे आणि भ्रस्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम करणार असल्याचा मानस असल्याचे यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राजुतुराणकर यांनी सांगितले.
या निवडीमुळे राजु तुराणकर आणी सागर मुने यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव हो