बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव पुरस्कार जाहिर.

63

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी दि २६: बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२०-२१ चे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.यात ३ तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.
कर्तव्यनिष्ठा पुरस्कारासाठी कासारकोळवण( तालुका संगमेश्वर)येथील श्री सुभाष मांगले आणि श्री विश्वास मांगले यांची निवड करण्यात आली आहे. कार्यगौरव पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये धामणसे या गावातील कारागिर श्री अशोक एकनाथ पांचाळ, फिनोलेक्स फाटा येथील ७० वर्षीय व्यावसायिक शैला सिध्देश्वर लिमये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर बाजार ( तालुका मालवण ) येथील काचेचे दिवाबत्ती कारागिर श्री सुरेश तोडकर यांचा समावेश आहे.
सर्व पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या निवासस्थानी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील किंवा रजिस्टर पोस्टाने पोहचवले जातील असे ट्रस्टच्यावतीने विश्वस्त श्री यशराज बोडस यांनी कळविले आहे.

*दखल न्यूज भारत*