वैरागड परिसरातील शेतकऱ्यांचे धान खरेदी महामंडळावर घेण्यात यावे. अन्यथा आत्मदहाचा इशारा. – धान्य आनलाईन पद्धतीने घेण्यात यावे. -वैरागड परिसरातील पीडित शेतकऱ्यांची आरमोरी तहसीलदारांना निवेदन.

260

 

प्रतिनिधी// प्रलय सहारे

वैरागड :- येथे दोन महिन्यांपासून धान खरेदीसाठी महामंडळ सुरू झाले. काही कालावधीत धान्य गोदाम फुल झाल्याने महामंडळ बंद करण्यात आले. यामुळे गहन विवंचनेत पडलेल्या शेतकऱ्यांनी धान्य कुठे विकावे या विचारात असलेला शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करीत असून धान खरेदी महामंडळ सुरू करून आनलाईन पद्धतीने धान्य खरेदी करण्यात यावे अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे आरमोरी तहसीलदार यांना दिला आहे.
काबाड-कष्ट, अति मेहनत करून निसर्गाच्या कोपाचे सामना करून मिळेल त्या पद्धतीने शेतामध्ये धान पिकवीत असतो. मळणी झाल्यानंतर धान विक्री करून आपल्या परिवाराचे, कुटुंबाचे उदर-निर्वाह करण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि शासनाच्या हलगर्जीपणामुळे हाल-अपेष्टा सहन करावे लागत आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मागील वर्षाचे दुष्काळ विसरून शेतकरी जोमात पीक पिकविण्याच्या कामात लागला. पुन्हा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्याची निराशा झाली. हातात आलेले पीक कसेबसे जमा करून धान्य व्यापाराला किमतीत कमी किमतीत विक्री न करता शासनाला विक्री करून जास्त मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु शासनाच्या हलगर्जीपणामुळे हताश झालेला येथील शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करीत आहे.
दोन महिन्यांपासून घरात असलेल्या धानाला रोगराई लागलेली आहे, उंदीर आणि इतर जीव धनाची नासाडी करीत आहे, बारदानातल्या धानाची नासाडी होत आहे. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातच महामंडळाने धान्य खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने आत्महत्या शिवाय कोणताही पर्याय उरला नाही. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची, गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय, आरमोरी तहीलदार कार्यालय, कृषी विभाग आणि महामंडळ संयोजक राहतील. महामंडळाने गोदाम उपलब्ध करून देऊन टोकन आनलाईन पद्धतीने धान्य वेळेवर घ्यावी. अन्यथा वैरागड आणि परिसरातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा वैरागड आणि परिसरातील शेतकरी मार्फत आरमोरी पंचायत समिती उपसभापती विनोद बावनकर, राजकुमार नंदरधाने आणि राकेश सोमनकार यांनी आरमोरी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.