तब्बल ५ महिन्यापासून मुरुम उत्खननाचा पंचनामा अहवाल,तहसीलदार चिमूर यांच्याकडे सादर केलाच नाही! –लिजधारक-शेतकरी-अधिकारी-कर्मचाऱ्यांत साटेलोटे,महाभयंकर भ्रष्टाचार.. — १४ आॅक्टोंबर २०२० पर्यंत एकूण ४ हजार ५०० ब्राश मुरुमाची होती लिज,प्रत्यक्ष उत्खनंन झाले होते २७ हजार ७३०.९९ ब्राशचे! — दिनांक १४ आॅक्टोंबर २०२० रोजी केला होता पंचनामा.. — सबंधितांवर फौजदारी कारवाई होणे व जादा ब्राश मुरुम उत्खननाचे नियमानुसार तिनपटीने त्यांच्या कडून रुपये वसूल करणे आवश्यक आहे.

164

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुक्यातंर्गत मौजा जांभुळघाट शिवारात,मौजा सावरगाव येथील शैलेश पांडुरंग पराते यांचे भुमापन क्रमांक ३२ अंतर्गत पट्या द्वारा मिळालेले शेत २ हेक्टर ४ आर आहे.या शेतातील सर्व भागात लिजधारकांद्वारे मुरुमाचे उत्खनंन केले आहे.
लिज अंतर्गत मुरुमाच्या ब्राश पेक्षा,जादा मुरुम ब्राशचे उत्खनन केल्या बाबत शंका असल्यामुळे,मौजा जांभुळघाट येथील शैलेश पांडुरंग पराते यांच्या भु.क्र.३२ शेतातंर्गत मुरुम उत्खनन केलेल्या सदर शेतजमीन जागेची,दिनांक १४ आॅक्टोंबर २०२० रोज बुधवारला, जांभूळघाट मंडळ अधिकारी आर.एन.पाटील,यांच्या उपस्थितीत,जांभुळघाट साझ्याचा प्रभार असलेले तलाठी पि.सी.मेहरकूरे,मांगलगाव तलाठी आर.नन्नावरे,जांभुळघाट कोतवाल टिकाराम वाघ,मांगलगाव कोतवाल प्रशांत खेडकर,यांनी मोजमाप केले व मोजमाप करुन स्थळ पंचनामा केला.परंतू सदर मुरुम उत्खनंन शेत स्थळाचा पंचनामा तब्बल ५ महिणे उलटून गेले तरी सुद्धा चिमूर तहसिलदार संजय नागटिळक यांच्याकडे सादर करण्यात आला नसल्याने,भ्रष्टाचाराचे बरेच खोल पाणी मुरले असल्याची व मुरत असल्याची दाट शंका आहे.
दिनांक १४ आॅक्टोंबर २०२० ला,मुरुम उत्खनंन जागेचे करण्यात आलेले २ भागातील मोजमाप असे होते.
१) लांबी :- १६४ मिटर..
रुंदी :- ७७ मिटर..
खोली:- ०२ मिटर..
२) लांबी :- ७५ मिटर…
रुंदी :- ७४ मिटर…
खोली:- २ मिटर…
या दोन्ही मोजमापाचे मुरुम ब्राश मध्ये रुपांतर केले असता,२७ हजार ७३०.९९ ब्राश मुरुमाचे प्रत्यक्षदर्शी उत्खनंन केले असल्याचे मोजमाप नुसार आढळून आले.दिनांक १४ आॅक्टोंबर २०२० रोज बुधवारच्या मुरुम उत्खनंन शेतजमीन स्थळाच्या मोजमाप पंचनाम्या नुसार अहवाल दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ आॅक्टोंबर २०२० रोज गुरुवारला,तहसीलदार चिमूर यांना सादर करायचा होता.मात्र,तब्बल ५ महिणे उलटून गेले तरी मुरुम उत्खनंन संबंधात अहवाल अजूनही सादर करण्यात आला नाही.
सावरगाव तलाठी तथा तात्कालीन जांभुळघाट प्रभार असलेले तलाठी पि.सी.मेहरकुरे यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे दिनांक २५ मार्च २०२१ रोज गुरुवारला संपर्क केला असता,मी दुसऱ्या दिवशी १५ आॅक्टोंबर २०२० रोज गुरुवारला,जांभूळघाट तलाठी साझ्याचे तलाठी जिवन येरमे यांच्याकडे त्यांच्या साझ्याचा प्रभार दिल्यामुळे मुरुम उत्खनंन स्थळ शेतजागेचा पंचनामा अहवाल चिमूर तहसिलदार यांचेकडे सादर केला नसल्याचे बोलले.परंतू प्रभार देताना त्यांनी मुरुम उत्खनंन स्थळाची पंचनामा प्रत तलाठी जिवन येरमे यांच्याकडे दिले नाही,असे तलाठी जिवन येरमे यांचे म्हणणे आहे.
मंडळ अधिकारी आर.एन.पाटील,यांच्या सोबत दिनांक २४ मार्च २०२१ रोज बुधवारला भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता,मुरुम स्थळ पंचनामा अहवाल सादर केला किंवा नाही याची कल्पना नसल्याचे सांगितले.
लिजधारक व शेतकरी यांना वाचविण्याच्या फंदात सावरगाव तलाठी पि.सी.मेहरकुरे,मंडळ अधिकारी आर.एन.पाटील,हे आपले कर्तव्य कसे काय विसरू शकतात?आणि का म्हणून विसरतात?हा प्रश्न शंकाकृत अंतर्गत अनेक प्रकारच्या गंभीरता निर्माण करतो आहे व अनेक मुद्द्यांना खुले करतो आहे.
मात्र,चिमूर तालुक्यात वैद्य व अवैध रेती-मुरुम-माती उत्खनना अंतर्गत अधिकारी,कर्मचारी,लिजधारक,शेतकरी,यांचे साटेलोटे खुपच गंभीर स्वरूपाचे असून या सर्वांच्या संगनमताने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे अनेक उत्खनंन स्थळांच्या जागेवरून स्पष्ट होते आहे.
चिमूर तालुक्यातील सर्व उत्खनंन स्थळांची,वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी होणे अती गरजेचे आहे,व सबंधीत सर्व जिल्हा आणि तालुका अधिकारी,कर्मचारी,लिजधारक,शेतकरी यांच्यावर फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे.तद्वतच त्यांच्याकडून मुरुम मातीच्या जादा उत्खननाचे नियमानुसार प्रत्येक ब्राश मागे तिन पटीने रुपये वसूल करणे तेवढेच कर्तव्याचे आहे,एवढे मात्र निश्चित.