पाटणबोरी पोलीस स्टेशन च्या वतिने शांतता कमिटीची सभा संपन्न

178

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

पाटणबोरी पोलीस स्टेशन च्या वतिने येथील पोलीस पोस्ट समोरील पटांगणावर होळी, रंगपंचमी ,रमजान ईद, ईत्यादी सना निमित्त शासनाच्या सुधारित नियमांची माहिती तसेच काेराेनाचा संसर्ग टाळण्याकरीता उपाय, योजना तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच शासनाचे गाईडलाईन बाबत सविस्तर मार्गदर्शनाकरिता शांतता कमिटीची सभा घेण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित सरपंच सौ.नीताताई प्रदीप उप्परवार, औट पोस्ट इन्चार्ज सपोनि/ भारत चपाईतकर, ग्रा.पं. सचिव विनोद मोरे हे उपस्थित होते. यावेळी शासनाच्या नवीन गाईडलाईन नुसार, होळी,धुलिवंदन या सर्व सन, उत्साहामध्ये कोरोनाचे नियम व अटी चे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
*यावेळी सचिन पत्रकार ह्यांनी सभे मधे सुचना केल्या की, गावातील दुकानांमधे कलर विक्रीस परवानगी देऊ नये, जेणे करून कुणीही कलर लावणार नाही. यावर ग्रामसेवक तथा सहाय्यक पोलिस निरिक्षकांनी संगितले की महाराष्ट्र शासनातर्फे तश्या सुचना नाही परंतु गावात कोरोनाचा संसर्ग होवु नये लोकांच्या आरोग्याच्या द्रुष्टीने गावातील सर्व दुकानदारांना दुकानात कलर विक्रीस न ठेवण्यासाठी दवंडी च्या माध्यमातुन सुचित करण्यात येईल, असे संगितले.*
यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष आप्पा पोंक्षे, जमादार वसंत चव्हाण, कपिल दरवरे, शेखर सिडाम, निलेश यमसनवार, गजानन शिंगेवार, जयंत भागानगरकर आदींनी आपले मत व्यक्त केले. यावेळी संतोष कायतवार मंदुलवार ताई, दयाकर सिडाम, माजी सरपंच विनोद नीमलवार, माजी उपसरपंच अनिल पुलोजवार, गजानन राजूलवार, विजय अग्रवाल, बाबा काजी चिनय्या मिरलवार, मोबीन जाटू, मनीष अग्रवाल, संतोष नक्षणे, सचिन पत्रकार,विनोद कणाके,मोहन येनगुर्तीवार, विजय अग्रवाल, संतोष मामिडवार, रमेश कांदस्तवार, सुनील कर्लावार,आदी उपस्थित होते