आगामी होळी, रंगपंचमी उत्सवा निमित्त नाकाबंदी दरम्यान शिरपुर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, ७ आरोपींना अटक तर २ लाख ५७ हजारांचा मुददेमाल जप्त

76

 

वणी : परशुराम पोटे

आगामी होळी, रंगपंचमी तसेच शिवजयंती निमीत्त लावण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी तसेच पेट्रोलींग दरम्यान चंद्रपुर जिल्हयात जाण्या-या अवैध दारूवाहतुक करणा-या ७ इसमांवर रेड कारवाईत ५ केसेस करून २ लक्ष ५७ हजारांवर मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुरुवारी दि.२५ मार्च रोजी आगामी होळी, रंगपंचमी तसेच शिवजयंती निमीत्त लावण्यात आलेल्या विशेष नाकाबंदी तसेच पेट्रोलींग दरम्यान चंद्रपुर जिल्ह्यात काही इसम मोटर सायकलने विदेशी तसेच देशी मद्याची वाहतुक करणार आहेत, अशी गोपनिय माहीती शिरपुर पोलीसांना मिळाली होती.
अश्या माहीतीवरून शिरपुरचे ठाणेदार सचिन लुले, पोउपनि काडुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टॉप पथके तयार करण्यात आली होती. त्यापैकी काही पथके नाकाबंदी तसेच काही पथके पेट्रोलींग करीता नेमण्यात आली होती. सदर पथकांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीचे आधारावर एकुण ५ केसेस करून एकुण २ लक्ष ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून एकुण ७ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
यामध्ये आकाष पुरूषोत्तम गाडगे (२१) रा.जुनोनी ता.झरी जि.यवतमाळ यांचेकडुन हिरोहोंडा वाहन तसेच विदेश मद्याचा मुद्देमाल असा एकुण ७३ हजार ५०० रूपये,तर प्रफुल्ल अजय ठोंबरे(१९)अमीत प्रमोद येरगुडे(२०)दोन्ही रा.तुकुम, जि.चंद्रपुर यांचेकडून मोपेड मोटर सायकल व विदेशी मद्याचा माल असा एकुण ५५ हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
तर दुसऱ्या केस मध्ये
त्रिलेश राजेंद्र राहुलवार(२०) रा.चंद्रपुर, विपुल रविंद्र उपरे(२१) रा.चंद्रपुर यांचेकडुन हिरोहोंडा मो.सा व विदेशी दारू असा एकुण ७४ हजार ५०० रुपयेचा मुददेमाल तसेच
योगेश गणपत ढोले (३६) रा.पळसगाव, जि.चंद्रपुर याचेकडुन मोटर सायकल व देशी दारू चा माल असा एकुण ५२ हजार ३४० रुपयेचा मुददेमाल. घनश्याम दौलत पावडे (३३) रा. कोरटी चंद्रपुर, यांचेकडुन देशी दारू एकुण १५६० रू चा मुददेमाल,असा एकुण २ लक्ष ५७ हजारांचा मुद्देमालासह एकुण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ ,अपर पोलीस अधिक्षक श्री.धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि/ सचिन लुले, पोउनि/ कांडुरे, नापोकों प्रमोद जुनुनकर, सुगत दिवेकर, घोडाम, पोका खांडेकर, अमित पाटील, होमगार्ड सागर, वाढई यांनी केली.