तायक्वांदो स्पर्धेत गणराज तायक्वांदो क्लबचे सुयश

66

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : खेड येथे झालेल्या 14 व्या क्योरोगी आणि 8 व्या पुमसे खुल्या तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याच्या मुलांनी पुमसेमध्ये सांघिक तृतीय पारितोषिक मिळवत अनेक पदकांवर आपले नाव कोरले. साई तायक्वांदो स्पोर्ट्स खेड आणि खेड तायक्वांदो स्पोर्ट्स ऍकॅडमी आयोजित ही स्पर्धा 11 ते 14 मार्च रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान, शिवथर रोड येथे घेण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेत कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर सिनिअर आणि स्पेशल कॅटेगरी अशा विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंनी विविध गटात पदकांची कमाई केली. सुवर्ण पदकं: त्रिशा सचिन मयेकर, गौरी अभिजित विलणकर, आद्या अमित कवितके; कांस्य पदक: श्रेष्ठा अभिजित विलणकर, तसेच कु. त्रिशा मयेकर हीने बेस्ट फायटर चा किताब मिळवला, स्मित किरला क्लब कडून उत्कृष्ठ खेळाडू म्हणून सम्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. सहभागी खेळाडू स्मित सुनिल किर, आदीराज अमित कवितके, अर्थव रांजेद्र जांमसेंडकर या खेळाडूंना सहभाग नोदंविला आहे. विजयी खेळाडूना नगरसेविका सौ. शिल्पाताई सुर्वे यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. नेहा सुनिल किर, उदयोजक सौ.आश्वनी देसाई, सौ.पुजा कवितके, सौ.काव्या कामतेकर, सौं राजश्री कामत, श्री. अमित देसाई, श्री.अमित कवितके, श्री.सचिन मयेकर, श्री.दर्शन जाधव, श्री.दिपक मुकादम, श्री.अभिजित विलणकर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लबच्या सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तालुका संघटनेचे अध्यक्ष राम कररा, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, सचिव शाहरुख शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या संघाला प्रशिक्षक म्हणून प्रियांका सुनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं तर क्लबच्या प्रमुख प्रशिक्षक सौ. आराध्या प्रशांत मकवाना सह-प्रशिक्षक अनिकेत पवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

*दखल न्यूज भारत*