सावधान बकरे चोरांपासून!! पाच बकरे व दोन शेळ्या चोरट्यांनी पळविल्या

326

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी पासून जवळ असलेल्या नवीन ठाणेगाव येथील सुखदेव नैताम यांच्या गोठ्यातून रात्रीचे सुमारास दोन शेळ्या व पाच बकरे चोरट्यांनी पळविल्या.
मंगळवार चे रात्री शेतकरी सुखदेव नैताम व परिवार रात्री झोपले असतांना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या व पाच बकरे वाहनात भरले परंतु शेळ्यांच्या आरडा ओरडी मुळे अंधाराचा फायदा घेत पळ काढला. शेळ्यांच्या ओरड्न्यामुळे मालक जागा झाला पण चोरट्यांनी बाहेरून दरवाज्याची कळी बंद केली होती त्यामुळे मागील दार खोलून येत पर्यंत चोरटे पळून गेले.
शेळी मालकाचे यामुळे 80ते90 हजाराचे नुकसान झाल्याचे समजते.
अज्ञात चोरांविरुद्ध शेळी मालकाने पोलिसांना कळविल्याचे कळते.