न.प.कर्मचारी सह.पतसंस्थेच्या वतिने सेवानिवृत्त कर्मचारी मारोती मडकाम (मामा) यांचा सत्कार

104

 

विशाल ठोंबरे
दखल न्युज भारत

वणी नगर पालिकेचे कर्मचारी मारोती परशराम मडकाम यांचा सेवानिवृत्त झाल्याचे निमीत्ताने नगर परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतिने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार नगर पालिकेच्या शाळा क्र. १ मध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आला.
मनमिळाऊ स्वभावाचे धनी, तसेच संपुर्ण वणी शहरात त्यांची “मामा” म्हणुन ओळख निर्माण असलेले मारोती मडकाम यांची नेमणुक सन १९८५ ला वणी नगर परिषद मध्ये नळ कारागीर या पदावर झाली. मणुष्याला जिवन जगत असतांना सर्वात म्हत्वाचे आणि जिवनावश्यक वस्तु असेल तर ते आहे पाणी, आणी वणीकरांना पाणी पाजण्याचे भाग्य कर्मचारी मारोती मडकाम यांना मिळाले, कारण ते जलपुर्ती विभागात नळ कारागीर म्हणुन कर्मचारी असल्याने नळ कनेक्शन च्या माध्यमातुन प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष नागरीकांसोबत संबंध यायचा तसेच शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासंबंधी काहीही तक्रारी असल्यास प्रथम मडकाम हेच सोडवित होते, त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरीकांच्या गळ्यातील “ताईत” ते बनले होते. त्यामुळे त्यांना आदराने सर्व लोकं “मामा” म्हणायचे. मडकाम यांनी नगर पालिकेत १९८५ ते २०२० पर्यंत ३५ वर्षे सेवा केली असुन वयाच्या ५८ व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. यानिमीत्य मडकाम (मामा) यांचा सत्कार घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन न.प.कर्म.सह.पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत गोरे होते तर प्रमुख उपस्थितीत संस्थेचे महेश पारखी,माधव सिडाम,बंडु कांबळे, खुषाल भोंगळे,किशोर परसावार,शंकर आत्राम,अशोक मांदाडे,सिंधुताई गोवारदिपे,वंदना परसावार उपस्थित होते.