वेकोलिच्या सुरक्षा रक्षकाची गळफास लावून आत्महत्या

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
वणी क्षेत्रातील वेकोलिच्या पैनगंगा खदानीत कार्यरत सुरक्षा रक्षक राकेश सुधाकर बेल्लरवार वय वर्षे 35 रा. रामनगर ,घुग्घुस याने रात्रपाळीत काम करीत असताना पैनगंगा खदाण येथील नाकाबंदी जवळील वेकोलिच्या शेडला दुप्ट्यानी गळफास लावून आत्महत्या केल्याचे कळते. विरुर गाडेगाव कड़े जाणाऱ्या रस्त्यावरील शेल्टर हाउस मधे ही आत्महत्या झालेली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. शिरपूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पंचनामा करुन मृतकाचे शव उत्तरीय तपासणी साठी पाठवन्यात आले आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे. मात्र सदर घटना आत्महत्या की खून अशी चर्चा परिसरात आहे.