ब्रिटीश वसाहतीच्या काळात भारतातून चोरीस गेलेल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कलाकृती परत मिळाव्यात : मिलिंद किर

78

 

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, श्री मिलिंद किर यांनी ब्रिटनचे पंतप्रधान, तेथील दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, ब्रिटनचा भारतातील दूतावास, युनेस्कोचे संचालक, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस आणि भारत सरकारच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसह संसदेच्या दोनही सदनांनच्या सर्व सदस्यना अशी सुमारे 1800 पत्रे पाठवली.
डच सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे, त्यानुसार वसाहतीच्या काळात इंडोनेशिया, सुरीनाम, कॅरिबियन बेटे इत्यादी देशातून जेथे डच लोकांनी वसाहती केल्या होत्या, तेथून चोरी केलेल्या कलाकृतींच्या शोध घेण्यासाठी आणि अशा वस्तू त्या मूळ देशाला परत करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. श्री.किर यांनी लिहिलेली ही पत्रे वरील संदर्भानेच लिहिली आहेत.
डच सरकारने नुकत्याच जारी केलेल्या बातमीचे
“सांस्कृतिक वारसा वस्तू त्यांच्या मूळ देशाना परत करुन अन्याय दूर करणे” या शीर्षकाचे दि. 29/1/2021 चे पत्र आणि दि. 7/3/2019 रोजीच्या मार्गदर्शक सूचना “सांस्कृतिक वस्तूंचा परतावा: तत्त्वे व प्रक्रिया” याचे संदर्भ श्री. किर यांनी दिले आहेत. तसेच सन्माननीय खासदार श्री. शशी थरूर यांनी ऑक्सफोर्ड युनियनमध्ये ब्रिटिश सरकारने भारताची परतफेड कशी करावी याविषयी केलेल्या भाषणाचाही या पत्रात उल्लेख आहे.
श्री.किर यांनी ब्रिटिश सरकारला विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या शेजारील देशाप्रमाणेच कृती करण्याचा निर्णय घेऊन भारतातून नेलेल्या भारतीय संस्कृतीशी निगडित ऐतिहासिक कलाकृती भारताला परत कराव्यात.श्री.किर म्हणतात की ब्रिटीश सरकार योग्य ती कार्यवाही करेल याची मला आशा आहे.