पंचक्रोशीतील गजानन महाराजाचे भक्त देतात एका भक्ताला दररोज पुरणपोळीचं जेवण योग योगेश्वर संस्थान चा अभिनव उपक्रम

131

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

विदर्भ ही अवलिया संतांची भूमी आहे विदर्भा मध्ये अनेक महान अवलिया संतांचा अवतार झालेला असून प्रामुख्याने सर्व भक्तांचे श्रद्धास्थान शेगाव चे समर्थ सद्गुरु गजानन महाराज आहेत आणि आता गावो गावी गजानन महाराजांचे मंदिराची उभारणी होत असताना दिसत आहे अकोट तालुक्यातील वरुर जऊळका गावांमध्ये पंचक्रोशीतील भक्तांच्या माध्यमातून व गणेश महाराज शेटे यांच्या पुढाकाराने योग योगेश्वर संस्थान ची उभारणी करण्यात आली असून या संस्थांमध्ये बरेच धार्मिक ,सामाजिक, सांस्कृतिक ,कार्यक्रम नियहमीच राबवले जातात. पण या प्रगट दिन उत्सवाला एक आगळा वेगळा उपक्रम सुरु केलेला आहे समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचा अवतार हा अन्नाची महती पाटवण्या करिता आहे ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’गजानन महाराजांनी सर्व जगाला सांगितलं अन्नाची नासाडी करू नका अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि म्हणून गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत वेचून खाल्ले त्या समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या भक्तांनी मनात कोणताही संकल्प केला तर महाराज संकल्प सिद्धीस नेतात. गजानन महाराज समर्थ आहेत आणि म्हणून प्रगट दिनाला काल्याच्या कीर्तना मध्ये गणेश महाराज शेटे यांनी भाविकांना आव्हान केले गजानन महाराज समर्थ आहेत तर त्यांना दररोज नैवद्य ही त्याच पद्धतीचा यायला पाहिजे म्हणून महिन्याचे ३० मेंबर निवडण्यात आले प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य आणावा, सहकुटुंब सहपरिवार महाराजांची आरती करावी, आरतीनंतर महाराजांचा नैवद्य ग्रहण होईपर्यंत दहा मिनिट मंदिराचा दरवाजा बंद करावा आणि मंदिर उघडल्यानंतर त्यातील नैवेद्याचा काही भाग मंदिरातील गोमातेला द्यावा व मंदिर परिसरातील पुजारी व कर्मचाऱ्याला ते पुरणपोळीचं नैवेद्याचं ताट जेवण करायला द्यावे अशा पद्धतीचे नियोजन केले आणि या उपक्रमाला पंचक्रोशीतून श्रींच्या भक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे दररोज महाराजांना पुरणपोळीचा नैवद्य ही मिळतो व संस्थांच्या माध्यमातून एका श्रींच्या भक्तांना दररोज पुरणपोळी खावू घालण्याचे पुण्यही प्राप्त होते आणि त्या पुरण पोळी सेवन करणाऱ्या भक्ताचा त्या कुटुंबाला आशीर्वादही प्राप्त होतो कारण की अन्नदाना सारखा श्रेष्ठदान कोणतच नाही हा उपक्रम गणेश महाराज शेटे यांनी जिथे गजानन महाराजांचे मंदिर आहे अश्या बऱ्याच गावामध्ये पुढाकार घेऊन चालू केलेला आहे व श्रींच्या भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. व या उपक्रमांमध्ये श्रींचे फक्त मोठ्या आवडीने श्रद्धेने सहभागी होत आहेत.