गांजा तस्कर अडकले पोलिसांच्या ताब्यात (कुरखेडा पोलिसांची कार्यवाहि)

184

 

कुरखेडा/राकेश चव्हाण प्र

कुरखेडा शहरा नजीकच्या वाकडी शेत शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती येथील पोलिस निरीक्षक सुधाकर देडे याना मिळताच वरीष्ट अधिकार्यांच्या मार्गदर्शना खाली सदर शेत शिवारात धाड टाकत ओल्या गांजा सह शेतात बेकायदेशीर रित्या लागवड करनारा इसम कुन्ड़लिक कसारे रा कुरखेडा व खरेदी करुन तस्करी करणारे सौरव दहाडे व रितिक मच्छीराके दोघेही रा चिखली याना ताब्यात घेतले.जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन ५२किलो ९००ग्राम असुन त्याची किंमत २६४५००रु.व २५०००रु. किंमतीची मोटरसाइकिल अशी एकुण २८९५००रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आले .या तिघां आरोपी विरोधात अंमलि पदार्थ प्रतिबंधक कायदा अन्तर्गत विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पो.नी.सुधाकर देडे यांचे नेतृत्वात पो.ऊ.नी नारायण शिंदे,चा.पो.हवा. मानकर,पो.हवा.बारसागड़े,पो.शिललित जांभुळकर,लोमेशमेश्राम,मनोहरपूराम,अश्विनी रामटेके यानी केली आहे. पोलिस विभागाच्या धडक मोहिमे मुळे गोवंश तस्कर,गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे.