महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गडचिरोलीच्या भेटी व निवेदन .

119

 

ऋषी सहारे
संपादक

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना गडचिरोलीच्या वतीने विविध विभागांच्या भेटी घेऊन निवेदनासह चर्चा करण्यात आली.
अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक –
दि 31 आँक्टोबर 2005 नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या NPS योजनेत फाॅर्म भरण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी यासाठी भेट घेऊन चर्चा करण्यात आले.
आँक्टो. 2019 ला dcps योजना बंद करुन राज्य शासनाने विविध पत्र काढून nps योजना चालू केली.परंतू आधिच dcps योजनेचा परिपूर्ण हिशोब मिळाला नाही.
आता nps योजनेत कसं का जायचं ?? असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला.
शिक्षण उपसचिव,शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी जे पत्र काढलेत त्या पत्रामध्ये कर्मचाऱ्यांचा हिशोब अगोदर देण्यात यावे नंतरच त्यांना nps योजनेत समाविष्ट करुन घेण्यात यावे असे स्पष्टपणे नमूद केले असतांना कर्मचाऱ्यांचा हिशोब न देताच जिल्हास्तरावरुन (वेतन अधिक्षक) कर्मचाऱ्यांना nps योजनेचे फाॅर्म न भरल्यास वेतन रोखण्याची धमकी देण्यात आली.त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने पुढाकार घेऊन अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांची या संदर्भात भेट घेण्यात आली व सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर कुणाचेही NPS फार्म वा NPS कपात करणे या सबबीखाली वेतन देयके परत केले जाणार नाही आणि NPS फार्म भरुन घेण्याकरीता कोणतीही बळजबरी केली जाणार नाही व ज्यांनी NPS चे फार्म भरुन दिले नाहि त्यांचे कुणाचेही वेतन कपात करण्यात येणार नाही असे सांगीतले.त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेतनाचा मार्ग मोकळा झाला.
शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना NPS संदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
CMP व SGSP बाबत
दि 20/3/2021 ला संघटन च्या वतिने CMP या विषयाला अनुसरुन आँनलाईन बैठक लावली होती. त्यामध्ये आपण CMP व SGSP संदर्भात बैठक लावण्याच्या चर्चा केली होती. त्या संबंधाने दि 22/3/2021 ला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे बैठक घेवुन सविस्तर चर्चा करुन पुढील रणनिती ठरविण्यात आली.त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील इच्छुक शिक्षकांची यादी तयार करणे SGSP संदर्भात draft तयार करणे,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,मा.मुख्य वित्त व लेखा अधिकारी,शिक्षणाधिकारी यांच्या उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने भेटी घेणे याविषयी परिपुर्ण चर्चा बैठकीत करण्यात आली.
नियमीत व स्थायी प्रस्ताव बाबत शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली येथे शिक्षकांच्या प्रलंबीत नियमीत व स्थायी प्रस्तावाबाबत भेट दिली असता 142 शिक्षकांचे नियमीत व स्थायी चे आदेश तयार आहेत.असे त्यांनी सांगीतले.
वैद्यकीय परिपूर्ती देयके
या संदर्भात भेट दिली असता वैद्यकीय परिपुर्ती संबंधाने आढावा बैठकीमध्ये शिक्षकांची प्रलंबीत वैद्यकीय परिपूर्ती देयके मंजूर करण्यात आली.
आजच्या भेटीमध्ये
गुरुदेव नवघडे जिल्हाध्यक्ष,
बापु मुनघाटे सरचिटणीस,
गणेश आखाडे संपर्क प्रमुख,
विठ्ठल होंडे मिडिया प्रमुख,
रोशन थोरात संघटक (खाजगी विभाग),
प्राचार्य क्रिष्णाजी खरकाटे सर सल्लागार आरमोरी,
प्रशांत ठेंगरे तालुकाध्यक्ष आरमोरी,
दिपक सुरपाम तालुकाध्यक्ष धानोरा,
अतुल बुराडे तालुकाध्यक्ष देसाईगंज,
निकेश बन्सोड कार्याध्यक्ष आरमोरी,
हिरा मडावी प्रसिद्धी प्रमुख देसाईगंज,
मोहन दोडके,टिकेश ढवळे,सुरेश चव्हाण,सय्याजी कापगते,प्रमोद काशीवार,मनोज ढोरे,प्रमोद नन्नावरे, रतन सलामे,विश्वास श्रीरामे,धिरज मगरे,छन्ना खोब्रागडे,भानारकर , प्रा.पराग साळवे, हरिष करमरकर, मनोज वैद्य, साईनाथ नैताम, आकरे मॅडम व ८० ते ९० कर्मचारी उपस्थित होते.