पाथरगोटा येथील आरोग्य सेविकेची होणार उचलबांगडी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांना निलंबन करण्याचे आश्वासन पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये यांच्या धसक्याने प्रशासनात खळबळ

117

 

हर्ष साखरे/देवानंद जांभूळकर प्रतिनिधी
आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका हि वारंवार डिलिवरी पेशंटची हयगय केल्याने तात्काळ येथील आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात यावे अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला दि 26 मार्चला टाला ठोकु अशा इशाराच पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनातून दिला होता यावरुन प्रशासनात एकच खळबळ माजुन आज दि 24 माच ला तालुका आरोग्य अधिकारी टिकरे यांनी पाथरगोटा येथील आरोग्य उपकेंद्राला पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये यांच्या उपस्थितीत भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणल्या यात पाथरगोटा येथील आरोग्य सेविकेचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे सादर केला आहे कमीतकमी 15 एफिल पर्यंत मुदत द्या असे आश्वासन दिले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले असल्याने तुतास पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये यांच्या नेतृत्वात पाथरगोटा येथील गावकऱ्यांनी दिलेल्या आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाला कुलुप ठोकण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे
यावेळी पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये तालुका आरोग्य अधिकारी डाॅ टिकरे सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम मोतीलाल लिंगायत अशोक मिसार मनोहर दुमाने बबन दवै मोठ्या प्रमाणांत नागरीक महीला उपस्थित होते.