इलुर येथे मुलींच्या अभ्यासिकेचे उद्धघाटन चामोर्शी तालुक्यातील इलुर ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम

276

 

उपसंपादक /अशोक खंडारे

चामोर्शी तालुक्यातील इलुर ग्रामपंचायतने खास मुलींसाठी विशेष अभ्यासिकेचे उद्धघाटन करण्यात आले.
अभ्यासीकेचे उद्घाटन सरपंच तुळशीराम मडावी ग्रा. पं. ईल्लुर यांनी केले , विशेष अतिथी उपसरपंच रामचंद्र बामणकार , ग्रा.प. सदस्य श्रीमती फुलाबाई भाऊजी मडावी , सुरेखा कामसेन वनकर,मंगला सुनील मडावी,
कमलाबाई मडावी, संतोष सुकर मडावी,गीताताई भगवान बामनकार , सचिव आय. एम. बारसागडे ग्रा. पं. ईल्लुर गावातील नागरिक मोठ्या संख्येने अभ्यासक मुल, मुली उपस्थित होते
.4 वर्षापूर्वी ग्राम पंचायत ईल्लुर अंतर्गत मुले व मुलींसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. ती अभ्यासिका सुव्यवस्तीत सुरू असून ग्रामपंचायत ईल्लुरने एक पाऊल पुढे टाकत मुलींसाठी विशेष अभ्यासिका सुरू केल्याने सर्वत्र या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव आय. एम. बारसागडे यांनी केले तर संचालन निलेश वाय. कुंदावार यांनी केले.. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील मडावी, अतुल बोरकुटे, रुपेश चांदेकर, सूरज गलबले, अक्षय बोरकुटे, नितेश देठे, जगदीश कपाट, पत्रू सातर, विनायक नारनवरे, अक्षता लांबाडे, निषा कपाट, पल्लवी पातर,मीना पातर , स्नेहल ठाकूर,सानिका दुर्गे,स्नेहा नारनवरे इत्यादिनी सहकार्य केले.