कुरुड येथे पोषण पंधरवाडा अभियानाचे आयोजन

60

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील कुरुड येथे अंगणवाडीतील गरोदर माता,लहान बालकांची काळजी,प्रसूतीपूर्व तपासणी,पौष्टिक व सकस आहारासंबंधी विविध विषयांवर पोषण पंधरवाडा अभियानाचे आयोजन २३ मार्च रोजी करण्यात आले.
पोषण पंधरवाडा अभियानाअंतर्गत कुरुड येथील अंगणवाडी क्रमांक १ व २ मधील गावातील गरोदर मतांच्याओटी भरण्यात आल्या.माता आणी बाल सरंक्षण कार्डचे महत्व,प्रसूतीपूर्व तपासणी,प्रसूती विषयक गुंतागुंती,आय एफ ए आणि कॅल्शियमच्या गोळया खाण्याचे महत्व,लसीकरण,जंतनाशक,पौष्टिक व सकस आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
अंगणवाडी क्रमांक ७ मध्ये सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम यांच्या हस्ते बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले.
अभियाना प्रसंगी अंगणवाडी सेवीका,अंगणवाडी मदतनीस,आशा वर्कर प्रमख्याने उपस्थित होत्या.
गरोदर मातांमध्ये गावातील आम्रपाली लिंगायत,लक्ष्मी नंदनवार,निर्गुण ठाकरे,माधुरी कांबळी, प्रियंका मडावी,पौर्णिमा दिलीप निमकर,जाणका ढोरे,भावना दिघोरे व गावातील इतर महिला वर्ग मोट
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.