नॅशनल ब्रीलीअस् अवॉर्ड चंद्रपूरात…

55

‌ चंद्रपूर :–जिल्ह्यातील प्रख्यात फार्मसी कॉलेज अशी ओळख असलेल्या हाय टेक कॉलेज ऑफ फार्मसी ह्यांच्या शीरपेचात पर्यायाने जिल्ह्यत पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नेशनल ब्रिलियस अवॉर्ड चंद्रपूर जिल्ह्यातील हाय टेक कॉलेज. ऑफ फार्मसी ह्यांनी पटकावला .

हाय-टेक कॉलेज ऑफ फार्मसी हे मध्य भारतातील एक प्रख्यात फार्मसी महाविद्यालय आहे. येथे जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा आणि उच्च पात्र आणि अनुभवी विद्याशाखांची समर्पित टीम आहे. दरवर्षी सर्व विद्यापीठातील टॉपर्स ह्या कॉलेजमधून असतात. दरवर्षी ह्या कॉलेज चे विद्यार्थी उज्ज्वल यशाने उत्तीर्ण झाले आणि नामांकित फार्मसी उद्योगात दाखल झाले. महाविद्यालयात शैक्षणिक आणि अवांतर कामांसाठी उत्कृष्ट वातावरण आहे.
ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन ह्या वर्षीचा नॅशनल ब्रिलियांस अवॉर्ड हाय टेक कॉलेज ऑफ बि फार्मसी ला देण्यात आला ह्या वेळी कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत मोरे सर ह्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कॉलेज च्या उत्कृष्ठ यशा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.