सिंदेवाही नगरपंचायत अनेक समस्यांनी ग्रस्त,पदाधिकारी-अधिकारी लक्ष देईनात!

57

भगवंत पोपटे
उपसंपादक
रस्त्यांचे रुंदीकरण, नाल्यांचे बांधकाम,नगरातंर्गत स्वच्छता,पिण्याचे स्वच्छ पाणी,चाळधारकांची किरायाबाबत मागणी,अवैध उत्खनना द्वारे रेतीचा अवैध व्यवसाय,वैध पध्दतीने बांधकाम,नगर पंचायत आवारात वाहने ठेवण्याची समस्या,अशा अनेक प्रकारच्या समस्या सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत आवासून उभ्या आहेत,परंतू या महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडे व अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याचे त्यांच्या भुमीकेवरुन लक्षात येते आहे.
सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत दळणवळण करण्या संबंधाने अरुंद रस्ते असून नियमानुसार अरुंद रस्ते रुंद करण्याची गरज आहे.याचबरोबर नाल्यांचे नवीन बांधकाम करणे व जुन्या नाल्यातील घाण साफ करणे सुध्दा आवश्यक आहे.तद्वतच नगरपंचायत अंतर्गत सर्व परिसर स्वच्छ ठेवण्यासबंधाने योग्य नियोजन असने नागरिकांच्या आरोग्य दृष्टिकोनातून महत्वाचे ठरत असल्यामुळे या समस्या कडे नेहमी जातीने लक्ष देण्याची गरज आहे,असे नगरातंर्गत नागरिकांचे म्हणणे आहे.
सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत नागरिकांना नेहमी मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी दिर्घकालीन उपाययोजना आखणे आणि याच उद्देशाने कार्य करणे अगत्याचे आहे.याचबरोबर नगरपंचायत आवारात वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने,कर्मचाऱ्यांची वाहणे व नागरिकांची वाहणे ठेवण्यासाठी अळचण निर्माण होत आहे.ही समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायत अंतर्गत हालचाली होताना दिसत नसल्याचे राजकीय चित्र आहे.
शहरांतर्गत अवैध धंद्यांना महत्व आले असून,सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी प्रशासन जागरूक व सतर्क होईल काय?हा मुद्दा अनभिज्ञ असाच आहे.
सर्वात मोठी समस्या नगरपंचायत अंतर्गत चाळधारकांची असून मागील १,२,३ वर्ष अनुक्रमांकानुसार ७० ते ८० चाळधारकांनी नगरपंचायतच्या किरायाचे रुपये दिले नसल्याचे प्रकरण गंभीर आहे.नगरपंचायतने अकारण खोलीभाडे वाढविले असल्यामुळे चाळधारक किराया देत नसल्याचे प्रकरण खुप चिघडत आहे.या प्रकरणाच्या अनुषंगाने नगरपंचायत पदाधिकारी,अधिकारी व चाळधारक सामंजस्य पुर्वक तोडगा काढतील काय?हा प्रश्न अतिशय किचकट आहे.
परंतू नगरपंचायत अंतर्गत सर्व समस्या दूर करण्याची जबाबदारी शासक-प्रशासकांची असून,शासक-प्रशासक कशाप्रकारे कार्याचे वळण घेतात? यानुसार समस्या निकाली काढण्या संबंधाचा उदेश असेल.