आष्टी ठाण्यातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक समश्या सोडविण्यासाठी गेलेल्या ठाणेदारानी केला विनभंग -चौकशी करून दोषीवर योग्य कठोर कारवाई करणार, पोलीस अधीक्षक-अंकित गोयल

359

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली: जिल्ह्यतील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली घटना असून ही अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
आष्टी पोलीस स्टेशनं प्रभारी सखाराम बिराजदार यांनी आपल्या अधिनस्त काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या
पत्नीचा विनयभंग केल्याची ही घटना घडली आहे.
२२ मार्च रोजी दुपारी ०३:०० वाजता च्या सुमारास आष्टी पोस्टे. प्रभारी सखाराम बिराजदार हे आपले तीन चार कर्मचाऱ्यांसह पीडित महिलेच्या घरी जाऊन नवरा बायको मधील कौटुंबिक वाद सोडविण्यासाठी गेलेले ठाणेदार बिराजदार हे समजदारी देत गैरफायदा घेऊन पीडित महिलेचे पती व सोबत असलेले कर्मचारी यांना घराबाहेर पाठवून पीडित आदिवासी महिलेसोबत अश्लिल भाषेत बोलून पीडित आदिवासी महिलेचा विनयभंग केला.
त्यामुळे ठाणेदार सखाराम बिराजदार यांचे वर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेने २३मार्च रोजी पोलिस अधीक्षक यांच्या कडे लेखी तक्रारी द्वार दाखल केली आहे.
पीडित महिला जेंव्हा ठाणेदार बिराजदार यांच्या विरूध्द तक्रार दाखल करायला गेली असता, तिची तक्रार न घेता संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी ठाणेदार बिराजदार यांनी युक्तीचा वापर करून पीडित महिलेचे पती जे की ठाण्यातच शिपाई पदावर आहेत, त्याच्या वर मुद्दाम पणे आपली खुन्नस पूर्ण करण्यासाठी,
तक्रार करण्यास निघालेल्या आपल्याच शिपायाला रस्त्यातून परत पकडून आणून त्याचेवरच दारू पिऊन धिंगाणा घातला असा आरोप करत त्याचा जबरदस्तीने मेडिकल टेस्ट करून त्याला खोट्या प्रकरणात फसविण्याचा प्रयत्न ठाणेदार बिराजदार यांच्या तर्फे करण्यात आला होता असी पीडित महिलेने माहिती दिली.
ठाणेदार बिराजदार यांनी केलेल्या अरेरावी,अनुचित प्रकार पीडित महिला व कुटुंबाने संपूर्ण हकीकत सांगितली.
पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या कडे विचारणा केली असता त्यांनी चौकशी करून दोषीवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया दिली.