कोंढाळा येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅसचे वितरण

99

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे वनविभागाच्या जन विकासाच्या माध्यमातून डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत १९८ कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत एच पी गॅसचे वितरण संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत वित्तीय वर्ष २०१८-१९ मध्ये गावातील १९८ कुटुंबातील लाभार्थ्यांना २५०० रुपयात एका घरगुती गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले होते.शासनस्तरावरून निधी अभावी दोन गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले नसल्याने,सध्या स्थितीत शासनस्तरावरून निधी प्राप्त झाल्यामुळे २४ मार्च रोजी मोफत दुसरे एच पी गॅसचे वितरण करण्यात आले.
डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी योजना सर्वच स्तरातील लाभार्थ्यांसाठी असून वनांचे संरक्षण व्हावे,जंगलतोड थांबावी,गाव धुरमुक्त व्हावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेतील मोफत गॅस सिलेंडरचे वितरण करतेवेळी ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे,पोलिस पाटील किरणताई कुंभलवार, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीनभाऊ राऊत,सचिव वनरक्षक सय्यद,माजी उपसरपंच कैलास राणे, पंढरी नखाते,समर्थ गॅस एजन्सीचे कर्मचारी गोवर्धन दंडारे,ग्रामपंचायत सदस्य गोकुल ठाकरे,नालीत वालदे,कल्पना झिलपे,शेषराव नागमोती,राजू शेंडे,हितेश तुपट,श्रीराम मोहूर्ले,निळेश्वर शेंडे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.