स्थानिक बेरोजगार युवकांसाठी शिवसेना मैदानात

442

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

दिनांक २३ मार्च ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना घुग्घूस शहर प्रमुख(प्रभारी) सतिश बोंडे यांनी गुप्ता कोल वाशरी येथे जाऊन मॅनेजमेंट ला भेट दिली व त्यांच्याशी चर्चा केली . याप्रसंगी मॅनेजमेंट ला निवेदन देण्यात आले त्याद्वारे स्थानिक बेरोजगारांना त्यांच्या कौशल्यानुसार कंपनीमध्ये नोकरी देण्यात यावी ही मागणी करण्यात आली.
याप्रसंगी घुग्घुस युवा सेना नेते चेतन बोबडे ,सतीश गोहोकार व पंकज राजपूत यांचे सोबत अनेक शिवसैनिक उपस्थित होते.