मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष महादेवराव दहिकर यांचे 94 व्या वर्षी देहावसान

0
122

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि29जुलै-
मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी जि.गडचिरोली येथील संस्थेचे उपाध्यक्ष महादेवरावजी आत्मारामजी दहिकर यांचे अल्पशा आजाराने आज दि,29/7/2020 ला सकाळी 6:30वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूचे वेळी त्यांचं वय 94 वर्ष होते, दहिकर यांनी संस्थेला आपल्या उपाध्यक्ष काळात बराच योगदान दिलं.वामनरावजी वनमाळी यांचे अतिशय विश्वासू, निकटवर्ती म्हणून परिचित होते,अतिशय अनुभवी, मनमिळावू,अतिशय शिस्तप्रिय ,शांत स्वभावाचे धनी असलेले महादेवराव दहिकर अचानक निघून गेल्याने संस्थेत न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. संस्थेला व त्यांच्या परिवाराला त्यांच्या जाण्याने जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या परिवाराला,कुटुंबाला देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास आपल्या चिरशांतीत सामावून त्यांना शांती देवो हीच नम्र प्रार्थना। मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष किशोरभाऊ वनमाळी ,सर्व संचालकमंडळ व या संस्थेद्वारा संचालित सर्व विध्याशाखांच्या वतीने स्वर्गीय महादेवराव दहिकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे अंत्यसंस्कार आजच दुपारी 2:00 वाजता गडचिरोली येथील कठाणी नदीघाटावर होणार आहे.