राज्य प्राणी शेकरू ला राजाराम वनविभागाकडून जीवदान

181

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- कमलापूर वनपरिक्षेत्र,राजाराम उपक्षेत्रातील भगवंतराव आश्रम शाळा राजाराम च्या परिसरात राज्यप्राणी शेकरू सकाळच्या सुमारास थकलेल्या, दमलेल्या अवस्थेत शाळेच्या प्राथ. मुख्याध्यापक टी.सि.ओडनलवार व माध्य.मुख्याध्यापक टी.डी.थरारे यांना दिसून आले असता त्या राज्यप्राणी शेकरू ला पकडून पाणी वैगरे पाजून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली.
त्या स्थळी राजाराम चे वनपाल ए.बी.राखडे, राजाराम चे वनरक्षक सि.डब्लू.कांदो यांनी लगेच पोहचले आणि राज्यप्राणी शेकरु ला आपल्या ताब्यात घेतले आणि त्या राज्यप्राणी शेकरूला प्राथमिक उपचार करून सदर राज्य प्राण्याला योग्य आश्रय स्थानी घनदाट जंगलात सोडण्यात आले.
राज्यप्राणी शेकरूला जंगलात सोडून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगली प्राण्यावरील प्रेम व माणुसकीचे दर्शन दाखविली.
त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह, कर्मचारी अर्जुन पेंदाम, सुखदेव आलाम, पंकज पेंदाम, लक्ष्मण आलाम, आशिष आत्राम, संदिप मडावी आदी उपस्थित होते.