मोदी सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांत जनजागृती : अनिल जवादे – आलापल्ली येथे संयुक्त शेतकरी मोर्चा तर्फे शेतकरी आंदोलन जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली.

58

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- केंद्रातील भाजप सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होणार आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे. असे मत संयुक्त किसान मोर्चा चे आंदोलक अनिल जवादे यांनी आलापल्ली येथील आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

शेतकरी विरोधातील कानून कायदे, काळे कायदे परत घ्यावे, एम.एस.पी चे कायदे संसदेत पारित करावे स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट लागू करावा. अशा प्रमुख मागणीला लक्षात घेऊन किसान आंदोलनातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने किसान आंदोलन अनिल जवादे यांच्यासह महेश माकडे, दिनेश वाघ, गोपाल मांडवकर, विकास भोसले, प्रमोद चौधरी, गुलाब तलवार, दिलीप पाटील यांचा समावेश आहे.