आरमोरी शहरातील पाणी समस्या कधी सुटनार? विद्यानगर वासियांची मुख्याधिकारी कड़े निवेदण

62

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आरमोरी:- स्थानिक वॉर्ड क्रमांक 1, विद्यानगर, इटियाडोह कॉलनी येथील नाली व रस्ता
बांधकामासह पिण्याच्या
पाण्याची समस्या लवकर निकाली काढावी, अशी मागणी वॉर्डातील नागरिकांनी आरमोरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरमोरी नगर परिषदेंतर्गत प्रभाग क्र. 1 विद्यानगरजवळील
मुख्य रस्त्यापासून इटियाडोह कॉलनीपर्यंत नाली व रस्त्याचे काम करावे, वडसा मुख्य रस्त्यालगत पूलं रुंदीकरण, सोलर पाणीपुरवठा अंतर्गत ओम शांती भवनजवळ ट्युट वालवरती तयार करून भैसारे ते काशिनाथ पोटफोडे यांच्या घरापर्यंत बांधकाम करावे, ओमशांती भवन ते वसंतराव खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सोलर पाणीपुरवठा योजना देण्यात यावी, नळाचे पाणी नियमित देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. अनेक वर्षापासून नागरिक सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. निवेदनातील मागण्यांचा विचार करून त्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात
आला. निवेदन देताना काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, विनोद नेऊलकर, जयप्रकाश रामटेके, सुधीर
जुमनाके, ललित उंदिरवाडे, भावना बारसागडे, रेखा सयाम, रेखा दिघोरे, चंदा कुळमेथे, चिना चोपडे, अनुज्ञा बरडे, मीना गजभिये, कोकिळा बोरकर, अनिता पाटील, माधुरी
गुंडरवार, अनुराधा ठाकूर, आशिष खोब्रागडे, गीता खोब्रागडे उपस्थित होते.