बकरी ईदकरिता शांतता समितीची बैठक संपन्न

 

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी(ता प्र) : बकरी ईद म्हणजे ईद-उल-अजहा या धार्मिक सणानिमित्ताने शांतता व सुव्यवस्था राखली गेली पाहिजे म्हणून पाराशेवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वधर्मीय व मुस्लिम समुदायाचे लोकप्रतिनिधींची बैठक पाराशिवनी पोलिस स्टेशन चा निरिक्षक विलास चौहान यांचे प्रमुख उपस्थितीत येथील मशिदींचे धर्मगुरू (ईमाम) व या क्षेत्रातील सर्वधर्मीय लोकप्रतिनीधींची बैठक मंगलवारी (२८ जुलै) सकाळी ११.००वाजता पोलिस ठाण्याच्या सभागृहामध्ये घेण्यात आली. बैठकीत पलिस निरिक्षक विलास चौहान यांनी बकरी ईद निमित्य शासनाचे दिशा निर्देश समजावून सांगितले. तसेच ईदची नमाज ही आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन करत कुर्बानी देताना सावधगिरी बाळगावी किंवा या ऐवजी कोरोना संकट काळात गोर गरिबांची मदत करावी. तसेच गर्दी करू नये, अशी विनंती केली. याप्रसंगी उपस्थित जनप्रतिनिधीं कडून सूचना मागितल्या गेल्या. याप्रसंगी आपआपल्या घरीच नमाज अदा करत कुणालाही त्रास होणार नाही तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे धर्मगुरू व सर्व प्रतिनिधींनी सांगीतले. याप्रसंगी ज्ञानोबा पळनाते सहाय्यक पोलिस निरीक्षक सुद्धा उपस्थित होते. . या वेळी जामा मस्जित कमेटी पारशिवनी चे सर्व कार्यकर्ते सह पदाधिकारी
अध्यक्ष ,याकूब शेख ,सचिव, अफरोज खान ,मौलाना रफीक रिज़वी,बबलू शेख,सलीम शेख, सलाम बाघाड़े, हाजी राशिद बाघाड़े, निसार शेखआनी बहु संखयेत मुस्लिम भाई
बकरी ईद निमित्य शाति समिती ची बैठकीत हजर होते