झुळूक वारा आला गेली,  साधारण पाऊस आला गेली,  वादळ आले गेली,  गडगडाट झाला गेली,  विज चमकली गेली, फांदी पडली गेली,  तार तुटला गेली,  जंपर तुटला गेली,  कंडक्टर तुटला गेली हिच्या जाण्याला कांही मर्यादा आहे की, नाही. ?

141

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुक्याचे ठिकाण असलेल्या सिंदेवाही शहरात महावितरण चे ११, के. व्हि., ३३, के. व्हि., ६६, के. व्हि. आणि १३२ के. व्हि. जनित्र अस्तित्वात असून, सिंदेवाही येथे उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय आहे. त्यांचे अधीनस्त एक सहाय्यक अभियंता, एक शहरी कनिष्ठ अभियंता, व एक ग्रामीण कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत. सिंदेवाही सबस्टेशन वरून सिंदेवाही १,२, नवरगांव १,२, शिवणी आणि पाथरी विद्युत वाहिनी कार्यरत आहेत. परंतु पाथरी विद्युत वाहिनी चे ग्राहकांसाठी वर्षभर विद्युत पुरवठा खंडित होन्याला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात तर विचारूच नका. साधारण झुळूक वारा आला, गेली. साधारण पाऊस आला, गेली. वादळ आले, गेली. गडगडाट झाले, गेली. विज चमकली, गेली. फांदी पडली, गेली. तार तुटला, गेली. जंपर तुटला, गेली. कंडक्टर तुटला, गेली. हिच्या जाण्याला कांही मर्यादा आहे की नाही.? असे होऊन बसले आहे. पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने अंधारात सरपडणारे विषारी साप, विंचू रस्त्यावर येतात. रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांचा त्यावर पाय पडून चावल्याने जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास जबाबदारी विज वितरण कंपनीची असेल काय ? कारण हा पाथरी विद्युत वाहिनी चा रोजचाच आणि नित्याचाच प्रकार होऊन बसला आहे. त्यामुळे विजग्राहकांना त्याची सवयच झालेली आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण ती एक जुनी म्हण आहे. “रोजचा मरे त्याला कोण रडे” ह्या म्हणीचा प्रत्यय पाथरी विद्युत वाहिनी वरील ग्राहकांना आल्यावाचून राहत नाही.
‌‌ संमंधीत अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्षामुळे विद्युत ग्राहकांना दररोजच विद्युत खंडीत होण्याचा त्रास सहन करण्याची वेळ येण्यामागचे कारण म्हणजे, जंगलांतून गेलेल्या विद्युत लाईनचे बाजूला असलेल्या झाडांची ट्रि कटींग उन्हाळ्यात करायला हवी, ती केली जात नसल्याने पावसाळ्यात वाऱ्याने फांद्या तारावर तुटन पडण्याचा प्रकार सुरू असतो. त्याला जबाबदार विज वितरण कंपनी नक्कीच आहे. विज ग्राहकाला विजबील भरूनही रात्रभर अंधारात राहावे लागत असेल, तर ती सेवा कोणत्याही कामाची नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागेल. विज ग्राहकांने विजबील मुदतीत भरले नाही तर त्यावर दंड आकारण्याचा वा विद्युत कनेक्शन कापन्याचा अधिकार कंपनीचे कर्मचाऱ्यांना आहे. मग ग्राहकांना नियमित सेवा देने गरजेचे नाही काय ? लॉकडाऊन चे कालावधीत रिडींग न करता ३ महिन्याचे एकत्र विजबील देऊन सामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडण्याचा अधीकार तुम्हाला कोणी दिला. व तो कोणत्या आधारावर दिला. हा प्रश्र्न सहजपणे उपस्थित होतो. विजग्राहकांना न भावनारे एकत्र ३ महिन्यांचे विजबील दिल्याने त्यांची प्रतारणा केली गेली नाही काय ? असे अनेक प्रश्न विज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडल्याने भेडसावत आहेत. कृपया विज वितरण कंपनीने विज ग्राहकांप्रती आपुलकीने व सामंजस्याने व्यवहार करून, यथायोग्य सेवा देने अनिवार्य समजावे. हिच अपेक्षा !