सिदेवाही पोलिसांनी केली अनपेक्षित मोठी कामगिरी. टाटा ट्रकमध्ये भरलेल्या खाली टिनाचे पिप्याखाली दडवली होती, देशी, विदेशी दारू.

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार निशिकांत रामटेके हे आपल्या सहकारी कर्मचारी यांचेसोबत दिनांक – २८/७/२०२० ला सकाळी ५-३० वाजता गस्तीवर असतांना सिंदेवाही टॉऊनमध्ये पेट्रोलींग करून, सिंदेवाही वरून राजोली मार्गाने पेटगांवकडे जात असतांना सरडपार गावाजवळ एक कत्थ्या रंगाचा संशयीत ट्रक जात असता त्याला हात दाखवून ट्रक थांबविण्यासाठी इशारा केला असता, त्याने फौजी धाब्याजवळ ट्रक थांबवून तो ट्रक सोडून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता, तो मिळून आला नाही. सदर संशयीत ट्रक ची तपासणी करायची असल्याने आम्ही पंच म्हणून सिंदेवाही वरून दोन व्यक्तींना फोनद्वारे फौजी धाब्यावर बोलाविले व संशयीत ट्रक ची तपासणी करायची असल्याने तुम्ही हजर राहा असे सांगितले. त्यावर ते तयार झाले. तेव्हा त्यांचेसमक्ष ट्रकची तपासणी केली असता, सदरचा ट्रक टाटा कंपनीचा असून, त्याचा क्रमांक-एम. एच ३१, सि. बी. ३६७७ असा आहे. ट्रकचे केबिन ची तपासणी केली असता, ट्रकचा डाला काळ्या ताळपत्रीने पुर्णपणे झाकला असल्याने ट्रकची ताळपत्री उचलून आतमध्ये डोकावून पाहिले असता, तेलाचे रिकामे टिनाचे पिपे त्यामध्ये दडवून ठेवलेली देशी, विदेशी दारू आढळून आल्याने पंचासमक्ष ट्रकचा पंचनामा करून, ट्रक पोलिस स्टेशन ला जमा केला. तेव्हा ट्रकमधून २९ नग खर्ड्याचे खोके, देशी दारू रॉकेट संत्रा ब्रॅण्ड २,९०० नग तसेच चुंगळ्यामध्ये २,८०० नग असे एकूण ५,७०० नग, एकूण किंमत ५,७०, ००० रुपये. तसेच ३३ ख्रर्ड्याचे खोके विदेशी दारू मॅगडॉल नं. १, नग ३,५८४. किंमत ४,७५,०००/- रुपये. आणि ट्रक ची किंमत ८,००,०००/- रुपये असा एकूण १८,४६,२००/- रुपये चा मुद्दे माल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ठाणेदार निशिकांत रामटेके, पो. हवा देवानंद सोनुले, पो. शि. राहुल राहाटे, व गाडी चालक सहाय्यक फौजदार कामडी यांनी केली. सदर मामल्यात अप. क्रमांक- ३७८/२०२० कलम ६५ (अ) म.दा.का. नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर करीत असल्याचे पोलीस सुत्रांनुसार कळले.