मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्त युवा सेने तर्फे पांढरकवड़ा येथे अपंगान्ना तिन चाकि सायकल चे वाटप

148

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
दि. २८/०७/२०२० ला पांढरकवडा येथे
शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य चंद्रपुर जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांच्या कडुन पांढरकवडा येथील गरजु विकलांग व्यक्तिला तिन चाकी ट्राय सायकल चे वाटप करण्यात आले. यावेळी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारधारेने चालत जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या आदेशाने व युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांच्या हस्ते सायकल वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा क्षण फुलविला. सायकल देते वेळेस पांढरकवडा युवा सेना शाखा प्रमुख प्रफुल ढवरे , महेश शेंडे , चेतन बोबडे, कोमल ठाकरे ,अंकित कावळे,राजु गुरणुले व शिवसैनिक यांची उपस्थिती होती.