सनफ्लॅग कंपनीच्या कामगारांच्या मागण्या लवकरच पूर्ण होणार : आमदार डॉ परिणय फुके यांच्या मध्यस्थीने तोडगा निघणार.

0
85

संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज
ऋग्वेद येवले साकोली शहर प्रतिनिधी
सनफ्लॅग आर्यन अँड स्टील मजदूर सभा भंडारा व कंपनीच्या व्यवस्थापन समितीची संयुक्त बैठक आमदार डॉ परिणय फुके यांच्या सोबत नुकतीच घेण्यात आली होती. यावेळेस युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या बाबत सविस्तर चर्चा केली. मागण्यांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इच्छुक कामगारांना कामावर घेणे, लॉकडाऊन दरम्यान अनुपस्थितीचा संपूर्ण पगार कर्मचाऱ्यांना देणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये ७५% मनुष्यबळ कामावर घेणे, टेक्निकल कामे कंत्राटदार कामगारांकडून न करता, कंपनीतील स्थायी कामगारांना काम देणे, अश्या विविध मुद्यांवर चर्चा झाली.

यावेळी आमदार डॉ परिणय फुके यांनी कामगाराप्रति केंद्र शासनाच्या निर्देशाचे पालन करण्याच्या सूचना व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांना दिल्या व कामगारांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा असे निर्देश दिले.

आ. फुके यांच्या मध्यस्थिमुळे सनफ्लॅग कंपनीच्या कामगारांच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील असा विश्वास कामगारांना झाला असून याबाबत पदाधिकाऱ्यांनी आ.डॉ परिणय फुके यांचे आभार मानले.