Home यवतमाळ लोकमान्य टिळक व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन

लोकमान्य टिळक व्याख्यानाचे ऑनलाईन आयोजन

199

 

वणी : परशुराम पोटे

वणी नगरीच्या शैक्षणिक विकासाचा आधारस्तंभ असलेले लोकमान्य टिळक महाविद्यालय हे सांस्कृतिक उन्नयनाचे देखील महत्त्वाचे केंद्र आहे. या महाविद्यालयात १९६५ पासून अव्याहतपणे सुरू असणारी लोकमान्य टिळक स्मृती व्याख्यानमाला संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातिप्राप्त आहे.
मात्र यावर्षी जागतिक पातळीवर उद्भवलेल्या करोना संकटामुळे महाविद्यालयाच्या अन्य शैक्षणिक उपक्रमां प्रमाणेच हा मानबिंदू देखील ऑनलाइन पद्धतीने अविरत ठेवण्यात येणार आहे.
आपल्या महाविद्यालयातील व्याख्यानमालेत आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यापक गणांना स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे या हेतूने शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकांनी मागील वर्षी पासुन केलेल्या बदलानुसार,
दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ठीक ११-१५ वाजता आयोजित या व्याख्यानात महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गजानन अघळते हे लोकमान्य टिळक आणि श्रीमद्भगवद्गीता या विषयावर आपले विचार व्यक्त करतील.
811 9188 0816 या झूम मीटिंग आयडीवर 12345 या पासवर्डने किंवा https://www.facebook.com/ltmlibrary.wani या फेसबुक लाईव्ह पेजवर आपण या ऑनलाईन व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला , समस्त संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleजमाबंदी व सोशल डिस्टसिंगचा कासवी ग्रा.पं.ने उडविला फज्जा, स्वतः कासवी ग्रा.पं.सचिव व पशूवैघकिय परिचर झाले सहभागी
Next articleभंडारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग द्वारा नियमबाह्य प्रकाशित करण्यात आलेल्या निविदाबाबतची तक्रार करून निविदा रद्द