जमाबंदी व सोशल डिस्टसिंगचा कासवी ग्रा.पं.ने उडविला फज्जा, स्वतः कासवी ग्रा.पं.सचिव व पशूवैघकिय परिचर झाले सहभागी

378

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी:दि 28 जुलै-
संपूर्ण देशात मार्च महिन्यापासून लाँकडाऊन आहे.ग्राम स्तरावर कोरोना बाबत ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी असताना तालुक्यातील कासवी येथे स्थानिक कर्मचारी यांच्याकडून जमाबंदी व शोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडविल्याने इतर नागरिकांना कोरोनाबाबत काय माहिती देणार असा प्रश्न कासवी येथील नागरिकांनी केला आहे.सविस्तर वृत्त असे की पाऊस येत नसल्याने कासवी जंगल परिसरात पठाण देव म्हणून आहे आणि तिथे गेल्यानंतर पाऊस येथे असा समज आहे.

 

तिथे गेल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेतली असावी म्हणून ग्रामसेवक व पशूधन परिचर व काही कर्मचारी सहभागी झाल्याचा नुकताच एक विडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओ मध्ये जिल्हाधिकारी यांचा जमावबंदिचा आदेश धुडकावून स्वता सोशल डिस्टसिंग मास्क वगैरे आदेशाचा पूर्णता उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे.