त्या’ तिन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणार्या तरुणावर अखेर गुन्हा दाखल, शास्त्री नगर मधिल बेपत्ता मुलींचे प्रकरण

431

 

वणी : परशुराम पोटे

शास्त्रीनगर येथिल मैल खड्डा परिसरातील बेपत्ता झालेल्या ३ अल्पवयीन मुली प्रकरणी वणी पोलिसांनी अखेर त्याच भागातील एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शास्त्रीनगर येथील एका आरोपी विरोधात फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार दिनांक ११ जुलै रोजी पीडित अल्पवयीन मुलगी दुपारी २ वाजताच्या सुमारास शेजारी घरकामाला जाते असे सांगून घरून निघून गेली होती. मात्र सायंकाळ होऊनही ती परत आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी ती ज्या घरी गेली त्या घरी चौकशी केली असता त्या घरी ती कामाला आलीच नसल्याचे कळले. त्यानुसार त्यांनी वार्डात शोध घेतला असता आणखी दोन मुली गायब असल्याचे त्यांना कळले. त्यावरून या तिन्ही मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले.
दरम्यान त्यांना त्या मुली पंचशील नगर येथील एका घरी असल्याचे कळले. तिथे जाऊन पोलिसांनी त्या मुलींना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी या बेपत्ता झालेल्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.मात्र त्या घाबरुन असल्यामुळे त्यावेळी तक्रार देण्यात आली नव्हती. दिनांक २७ जुलै रोजी सकाळी त्यातील तक्रारकर्त्यांच्या मुलीने तिच्या पालकांना एेहतेशाम कबिर रज्जाक (२९) रा. शास्त्रीनगर वणी हा तरुण त्यांना फूस लावून वाईट उद्देशाने पुण्याला घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी एहतेशाम कबिर रज्जाक विरोधात भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी एेहतेशामने सदर तिन अल्पवयीन मुलींना पुण्यात नौकरीला लावुन देतो अशी बतावणी करुन पुण्याला घेऊन जाणार होता.मात्र त्याने लाकडाऊनचे कारण सांगुन त्या तिन मुलींना पंचशिल नगर येथिल एका घरी ठेवले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठे रँकेट समोर येईल!अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे.