अनोळखी माणसाचे प्रेत सापडले

0
89

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

गोंदिया:- पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण येथे एका दुचाकी मोटार सायकल चालक इसमास के. टी. एस. इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यास वैदयकीय अधिकाऱ्याने चाचणी करून अज्ञात इसम मृत असल्याचे घोषित केले. मृत इसमाचे अंदाजे वय ४० ते ४५ असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, अनोळखी इसम हा आपल्या दुचाकी मोटर सायकलने सकाळी ११.०० ते १२.०० वाजताच्या सुमारास पांढराबोडी ते हिवरा कॉलेज रोड दरम्यान बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. स्थानिक लोकांनी रुग्ण वाहिकेला पाचारण करून, त्याद्वारे के.टी. एस. इस्पितळात दाखल केले. तेथे त्या अनोळखी इसमास वैद्यकाने मृत घोषित केले.

उल्लेखनीय असे की, सदर व्यक्ती आपले सिटी-१०० बजाज या दुचाकी वाहन क्रमांक एमएच-३१ जी ५ – ९३६५ प्रवासास निघाला होता. त्याचे वाहणासोबत एक पोतळी आढळून आली. त्यात भाजीपाला, डाळ असा सामान आढळून आला. अनोळखी दुचाकी मोटर चालक यास अस्वस्थ वाटल्याने त्याने आपली दुचाकी मोटर रस्त्याचे बाजूला उभी करून तो झाडाखाली बसला. ह्यातच त्याची प्रकृती बिघडून त्याचा मृत्यू झाला. असे प्रथम दर्शनी वाटत आहे.

मृतकाचे अंगात लाल रंगाचे शर्ट, ओठवर जाळ केसाची मिशी, चेहरा गोल, बांधा मजबूत या वर्णनाचे इसम आढळून आल्यास गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे गोंदिया येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.