दुर्गम भागातील आदिवासी शेतकरी कुटुंबातील होतकरू मुलांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी :-
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या आदिवासी दुर्गम भागात येथील आदिवासी शेतकरी कुटुंबातील व बहुजन समाजातील गरीब व होतकरू मुलांना पी. डी. एज्युकेशन व फिजिकल संस्थेच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत फिजिकलचे मार्गदर्शन दिले जात होते. कोरोना महामारी काळात क्लास बंद पडला. तरीही या परिस्थितीवर मात करत संस्थेचे संचालक दिनेश देशमुख यांच्या संकल्पनेतून पी.डी. एज्युकेशनचे डिजिटल व्यासपीठ तयार करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नामवंत मार्गदर्शकांचेही या कार्यास सहकार्य मिळत आहे. महाराष्ट्र भरातील विद्यार्थ्यांचाही या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. आज महाराष्ट्रातील 50+ मुले या मोफत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा सेमिनारचा लाभ घेत आहेत. संस्थेचे संचालक दिनेश देशमुख यांनी या उपक्रमात सहभागी मा. डॉ. राणी जैन, पुणे,(सायन्स, भूगोल), मा. विशाल पाटील सर, जळगांव, (सायन्स) मा. अंकुश माकोडे सर, जळगांव,(हिस्टरी), प्रा. गोपाल वांडे सर, वाशीम, (मराठी व्याकरण), प्रा. ज्ञानेश्वर आघाव, अहमदनगर, (मराठी, इंग्रजी व्याकरण), मा. सुरज कोडापे सर, (भारतीय शासन व्यवस्था), तसेच आयुष्यावर बोलू काही…या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रा. ज्ञानेश वाकुडकर सर, नागपूर, (तरुणाईच्या वेगळ्या वाटा), डॉ. अविनाश सावजी (जीवन कस व का जगायचं?), मा. मोहनीशकुमार शेलवटकर, तहसीलदार ( प्रकट मुलाखत) या सर्वांचे आभार मानले. हे कार्य लोकमदत व लोकसहकार्यातून चालत असते. पण कोरोना काळात ही मदत बंद झाल्याने हे शैक्षणिक कार्य आर्थिक संकटात सापडलेले असतांना कौतुकास्पद कार्य करत आहे.