नाग सापाच्या दंशापासून चेकपोष्टवरील कर्मचारी बाल बाल बचावले

 

अतित डोंगरे दखल न्यूज प्रतिनिधी तिरोडा

तिरोडा : गोंदिया जिल्हा आपले स्वागत करीत आहे येथील नवेगाव खुर्द चेकपोष्ट उभारण्यात आलेली आहे. या चेकपोष्टवर आरोग्यविभागांतर्गत आरोग्य सेवक, पोलीस विभागाचे दोन असे चार कर्म आपली कर्तव्य२४ तास बजावीत असतात. रात्र पाळीत चेकपोष्टवर आपली कर्तव्य बजावीत असतांना रात्री सुमारे ९.३० वाजता दरम्यान चक्क वामकुशी करण्यासाठी लावण्यात आलेल्या अंथरुणावरील पलंगावर नाग शापाने दर्शन दिले. यावेळी सर्व कर्मचारी आपली कर्तव्य बजावीत होते. त्यामुळे नाग सापाकडून कोणत्याही कर्मचारी वर्गाला इजा झाली नाही. यामुळे आपली कर्तव्य वाजवीत असणाऱ्या कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
सेवा सुविधेचा अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यानी जातीने लक्ष देण्याची गरज पडली आहे.