प्रतिनिधी / मिथुन वैद्य.
रायगड : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यातच जून महिन्यातील दिनांक ३तारखेस निसर्गाने रैद्ररूप धारण करत रायगडसह अलिबाग तालुक्याला निसर्ग नावाचे वादळ येऊन धडकले आणि सारेकाही होत्याचे न्हवते झाले , प्रचंड वित्तहनी झाली सुदैवाने जीवित हनी टळली परंतू अनेकांनचे संसार उध्वस्त झाले जवळ पास दिडपावणे दोन महिने होऊन ही तालुक्यात अनेकजण आपला संसार आजही उभा करत आहेत. शासना मार्फ निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसाना बाबत मदत मिळत आहे.मात्र तालुक्यात निसर्ग चक्रीवादळा सह कोरोना महामारी ने झालेली विदारक स्थिती पाहता अनेक जण सामाजिक बांधिलकी जपत पुढे सरसावले त्यातच ज्येष्ठ समाजसेवक आम आदमी पार्टीचे दिलीप जोग , तसेच मावळा प्रतिष्ठान चे सचीव यतिराज पाटील , रायगड जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष मंगेश माळी ह्या योद्धयानी तर सामाजिक योगदान देत उल्लेखनीय कार्य केले हीच बाब विचारात घेत महाराष्ट्रतील श्रमिक मुक्त पत्रकार संघाच्या वतीने अशा सामाजिक योगदान देणाऱ्याना गौरवण्यात आले या प्रसंगी श्रमिक मुक्त पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश चव्हाण तसेच सदस्य आशिष भट ऋषिकांत भगत याच्या उपस्थितीत सामाजिक योगदान देणाऱ्या अशा योद्धानचा गौरवकरत एक सुत्य उपक्रम राबविण्यात आला .
दखल न्यूज भारत