आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने,महाराष्ट्र राज्य “शिक्षणमंत्र्यांना,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गडचिरोली यांच्या मार्फत निवेदन सादर… — पालकांना दिलासा देण्यासाठी विद्यार्थ्यांबाबत तातडीने पाउल उचलावे..

118

सतिश कडार्ला
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
कोविड-१९ महामारी दरम्यान राज्यातील उद्योग,व्यापार पूर्णपणे बंद असून यामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला घर कामगार, वाहन चालक,नोकरदार असे सर्वच नागरिक आर्थिकदृष्टया मोठ्या संकटात आले आहेत.
दुसरीकडे पाल्यांच्या शाळा बंद आहेत परंतु शाळा फी भरण्यासाठी सर्वांवर सक्ती होत आहे.पालक हतबल होऊन आपल्या पाल्यांना शाळा सुरु झाल्यावर शिक्षक त्रास देतील या भीतीमुळे हतबल झाल्याने आवाज उठवू शकत नाहीत.परंतु या काळात काही बाबी पूर्ण करत या लाखो पालकांना तातडीचा दिलासा देणे गरजेचे आहे.
१)फी संदर्भात तातडीचा अध्यादेश काढणे.
२)शुल्क अधिनियमन कायद्यात तातडीने बदल.
३)ऑनलाईन शिक्षणासाठीच्या अतिरीक्त शुल्कास बंदी.
४)सुविधांचे सक्षमीकरण.
५)पूर्व प्राथमिक शाळांच्या नियमावलीत सुधारणा.
६)आर्थिक हालाखीच्या काळात शाळांनी एनसीआरटी वा बालभारती शिवाय अन्य प्रकाशकांची पुस्तके-शालेय साहित्य सक्तीने करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी.
निवेदन सादर करतांना आप जिल्हा प्रमुख बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव देवराव दुधबळे, कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, शहर प्रमुख प्रकाश शेंडे, तालुकाध्यक्ष सुधाकर बुरांडे, अनुरथ निलेकर,सुरेश गेडाम, रामभाऊ कागदेलवार,संजय वाळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.