मालेवाडा परिसरात नक्षल बंदला संमिश्र प्रतिसाद

113

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
दरवर्षी 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान आदिवासीबहुल भागात नक्षह सप्ताह पाळला जात होता. मागील काही वर्षांपासून पोलीस विभागाच्या प्रयत्नांमुळे नक्षल सप्ताह पाळणे कमी-कमी होत आहे.
मागील काही वर्षांपूर्वी मालेवाडा परिसर नक्षल कारवायांसाठी प्रसिद्ध होते. परिसरात यावर्षी पोलीस विभागाने आधीच पत्रके टाकून नक्षल बंद न पाडण्याचे आवाहन जनतेला केले होते. आज सकाळपासून मार्केट अगदी शुकशुकाट होते. मात्र पोलीस विभागाच्या मार्गदर्शनामुळे दुपारपासून काही दुकाने उघडण्यात आली. मात्र काही दुकाने ही दिवसभर बंदच होती. अशाप्रकारे मालेवाडा परिसरात जनतेने नक्षल बंदला संमिश्र प्रतिसाद दिला.