शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न..

108

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

कोरोनाच्या या महासंकटकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे अभिवचन होते 80%समाजकारण आणि 20%राजकारण याच अभिवचनावर शिवसेनेच्या वतीने उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, माजी आ. संजय गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातला जो शेवटचा घटक आहे त्यांच्याकडे काहीच नाही. अशा लोकांना व गरजू महिलांना साडी चोळीचे वाटप व रेशन कार्ड उपलब्ध करून दिले. अकोट तालुक्यात किमान दोन हजार महिलांना साडीचे वाटप करण्यात येणार आहे व दोन हजार दुय्यम रेशन कार्ड देण्यात येणार आहे. त्याची सुरवात आज ग्राम पोपटखेड व सावरा येथून सुरवात करण्यात आली आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये माजी आमदार संजय गावंडे यांनी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे पदाधिकारी यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले .तसेच सत्ता असो किंवा नसो समाजाची सेवा अहोरात्र करू व समाजाचे हितोपयोगी असेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करू असे आश्वासित शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी केले.सर्व शिवसैनिकांच्या वतीने तालुकाप्रमुख श्याम गावंडे यांनी साहेबांच्या दीर्घायुष्याकरिता श्री. भगवान भोलेनाथ मंदिर येथे भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करून आरती केली. तसेच कोरोनाच्या या काळात उद्धवजी ठाकरे कुटुंबप्रमुखा प्रमाणे आपल्या महाराष्ट्राची काळजी घेत आहेत.असे उद्गार महिला जिल्हा संघटिका सौ. मायाताई म्हैसने यांनी आपल्या भाषणातून केले. तसेच पोपटखेड व सावरा येथे वृक्षारोपण करण्यात आले व साहेबांच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजन स्थळी थाळीचा कोणताही शुल्क न घेता पुरीभाजी व गोडशीरा चे वाटप करण्यात आले. आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोट शिवसेना शहरप्रमुख सुनील रंधे, उपजिल्हा संघटक विक्रम जायले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, तसेच विजय भारसाकळे, कमल भाष्कर, विजेंद्र तायडे (सरपंच पोपटखेड ), अजाबराव भाष्कर, श्रावण तायडे, बाबाराव तायडे, रितेश बोरखडे, प्रफुल गुप्ता (तंटामुक्ती अध्यक्ष, सावरा ), गौरव सपकाळ, देव नृपनारायण, नितीन सोनोने, यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.