धक्कादायक बातमी, कंटेनमेन्ट झोन मधुन अंत्यविधीसाठी गेलेली महिला निघाली पाँझिटिव्ह,अंत्यविधित सामिल झालेल्या ६४ जनांना केले क्वारटाईन, ‘त्या’ महिलेवर होणार गुन्हे दाखल

896

 

वणी : परशुराम पोटे

दिनांक 25 जुलै ला पॉझिटिव्ह आलेली महिला दिनांक 22 जुलै रोजी पोलीसांची नजर चुकवून कन्टेटमेंट झोन मधून चिखलगाव येथील मयत मध्ये गेली होती. ही बाब प्रशासनापासुन तिने लपवून ठेवली पण कडक विचारपूस केली असता तिने मयत मध्ये गेली असल्याचे कबूल केले.त्या मुळे खबरदारी म्हणून मयत मधील सामील झालेले 64 लोकांना qurtine करण्यात आले असून त्यांचे स्वँब तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. व त्या महिलेवर कारवाई करण्याचे निर्देश ठाणेदार वणी यांना देण्यात आले आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. आज वणी येथील कोविड केयर सेंटर मध्ये मागील 14 दिवसापासून पॉझिटिव्ह असलेले 65 वर्ष वय असलेले पुरुष व महिला यांना कोरोना चा कालावधी पूर्ण झाल्यामुळे पूर्ण उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.ते घरी होम क्वारंटाईन राहतील. सद्यस्थितीत एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती- 26 असुन,एकूण कोरोना मुक्त – 19 एकूण म्रुत्यु 1,
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह व्यक्ती -6,एकूण कोविड सेंटर ला भरती – 05
एकूण कंटेन्मेंट – 04
एकूण कोविड care ला भरती – 81एकूण तपासणी अहवाल अप्राप्त – 93 आजचे 64 धरून आहेत.