Home राजकीय “योग करताना शरीरावर भान असणे गरजेचे असते” – योगगुरु डॉ. विवेक चर्जन...

“योग करताना शरीरावर भान असणे गरजेचे असते” – योगगुरु डॉ. विवेक चर्जन मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या आॅनलाईन योग वर्गाला अनमोल मार्गदर्शन

335

 

दिलीप अहिनवे
मुलुंड मुंबई उपनगर प्रतिनिधी
दखल न्युज भारत

मुंबई, दि. २५ : बृहन्मुंबई महानगरपालिका शारीरिक शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या वतीने मोफत आॅनलाईन योग प्रशिक्षण वर्ग सध्या सुरु आहे. पर्यवेक्षक राजेश गाडगे, प्राचार्य रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाने योग तज्ञ रेणू निशाणे व जयंत निशाणे हे उपस्थितांना मार्गदर्शन करत आहेत.

आज औरंगाबाद येथील योगगुरु डॉ. विवेक चर्जन यांनी आॅनलाईन योग वर्गाला अनमोल मार्गदर्शन केले. विविध आसने प्रथम करुन दाखवली. प्रत्येक कृतीची व्यवस्थित माहिती सांगितली. तसेच प्रत्येकाला आसन करण्यासाठी संधी व वेळ उपलब्ध करुन दिला. योग करत असताना शरीरावर आपले भान असणे गरजेचे असते असे त्यांनी सांगितले. आसन करत असताना खाली वाकण्याची योग्य पध्दत कृती करुन दाखवली. पश्चिमोत्तासन शिकण्यासाठी कोणते तंत्र वापरावे हे प्रात्यक्षिकासह दाखवले. उत्कट आसन, त्रिकोनासन, उत्थित त्रिकोनासन, वीर भद्रासन भाग १, अर्ध चंद्रासन, पार्श्व हस्तपादासन, पार्श्व कोनासन, वीर भद्रासन भाग १, पादहस्तासन, अधोमुख श्वानासन, मार्जरासन, उर्ध्वमुख श्वानासन, स्वस्तिकासनात पर्वतासन अशा विविध आसनांची माहिती, कृती, प्रात्यक्षिके तसेच सर्वांचा सराव करुन घेतला.

डॉ. विवेक चर्जन यांनी १९९५ साली अमरावती येथुन B.A.M.S. (आयुर्वेदाचार्य) ही पदवी संपादन केली. सन १९९७ पासून आपला खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. प्राचीन भारतीय अध्यात्म शास्त्र आणि पाश्चात्य तत्वज्ञानाची आवड असल्यामुळे वैद्यकीय व्यवसाय सांभाळुन सातत्याने या विषयांचा अभ्यास केला.

सन २०१२ पासून योग विषयाचा अभ्यास सुरु केला. आसन आणि प्राणायामाचे अय्यंगार इन्स्टिट्युट, पुणे येथुन दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले. विविध आजारांवर आसनांचा कसा उपयोग होईल याचे अध्ययन केले. सन २०१५ मध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम पुर्ण केला. विविध कार्यशाळा आणि परिसंवादातुन मानवी मन, स्वभाव, आणि मानसिक आरोग्य या विषयाचे प्रशिक्षण दिले.

सध्या औरंगाबाद येथील आर एस एस जनकल्याण समितीच्या योगकेंद्राचे प्रमुख आहेत. तेथुन २०१५ पासून योगसिध्दांत विषयाची नियमित व्याख्याने घेत असतात. सन २०१५ मध्ये योग होलोस्टिक हेल्थ केअर सेंटर सुरु केले आहे. जीवनशैलीशी निगडित आजारांवर योग, आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून “मन निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते” या तत्त्वावर चिकित्सा केली जाते. अय्यंगार योग पध्दतीनूसार ते योगवर्ग चालवतात.

प्रशिक्षणाची सांगता शांतीपाठाने झाली. शेवटी सर्वांचे आभार जयंत निशाणे यांनी मानले.

Previous articleमहाराष्ट्र नाभिक मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न
Next articleराज्यमंत्र्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये- हर्षवर्धन पाटील