गस्ती मध्ये आढळलेला 15 क्विंटल मोहफुल सडवा वनविभागा द्वारे नष्ट

 

रुषी सहारे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

आरमोरी दि 28 जुलै-
आज दिनांक 28 /7 /2020 रोजी आरमोरी नियत क्षेत्रात गस्ती करीत असताना मोह फुल सडव्याचा वास आला. सदर जंगल पूर्ण फिरून पाहिले असता तीन ते चार ठिकाणी मिळून मोहफुले सडवा आढळून आला.
सदर बाबीची माहिती मिलीश दत्त शर्मा भा.प्र.से. वन परिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांना दिली असता, मौक्या वर उपस्थित होऊन त्यांनी आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. आरोपी न मिळाल्यामुळे सदर सडवा जंगलातच नष्ट करण्यात आला असून साधारणता त्याची किंमत बाजारभावानुसार एक लाख रुपये आहे. सदर कार्यवाही मिलिश दत्त शर्मा भा.प्र. से. वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आर बी गोटेफोडे क्षेत्र सहाय्यक आरमोरी व व्याघ्र गस्ती पथक यांनी केले.