शिवसेना पक्ष प्रमुख, तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकाप्योगी कामाचे सप्ताह, साजरे करण्याचा संकल्प गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीतून हृदय रोगाने ग्रासलेल्या अत्यंत गरीब महिलेला मदतीचा हात देण्यासाठी आपण प्रयत्न करणार- डॉ. श्रीकांत बनसोड

257

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज – माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख, तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकाप्योगी कामाचे सप्ताह, साजरे करण्याचा संकल्प घेतलेले देसाईगंज तालुका प्रमुख डॉ श्रीकांत बनसोड, यांनी आज देसाईगंज तालुक्यातील तुळशी ग्रामपंचायत मधील, श्रीमती शिल्पा रामटेके वय 32 वर्ष, या अल्प वय असलेल्या विधवा, व rheumatic heart disease and cardiomegaly या हृदय रोगाने ग्रासलेल्या अत्यंत गरीब महिलेला, बनसोड हॉस्पिटल वडसा, येथे आजीवन हृदय रोगाची मोफत वैद्यकीय उपचार करण्यासाठी निवड करून, आपल्या होमिओपॅथी पद्धतीचा वापर करून हृदय रोग बरा होत पर्यंत, आजीवन मोफत उपचाराचा संकल्प घेतला आहे या प्रसंगी पीडित हृदय रोगी महिलेचे दिर, श्री रामटेके जी उपस्थित होते. तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमं त्री व मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ. श्रीकांत बनसोड यांनी सांगितले.