आमदार व खासदार यांचे पेंशन सुविधा बंद करा… भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री संतोष ताटीकोंडावार यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी…

0
73

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुडडीगुडम : महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचा वेतनाचा व पेंशनचा बोजा शासनाच्या तिजोरीवर वाढत आहे असे अर्थमंत्री अजित पवार यांचे म्हणणे आहे.तरी आमदार व खासदाराना दिल्या जाणाऱ्या वेतन व पेंशन चा बोजा शासनाच्या तिजोरीवर वाढणार आहे.अपवाद वगळता महाराष्ट्रातील कोणत्याच आमदार व खासदारांची आर्थिक स्थिती खालावलेली नाही.
2005 नंतर नियुक्ती कर्मचाऱ्यांना जर जुन्या पेन्शनचा लाभ मिळत नसेल तर राज्यातील आमदार व खासदाराची ही पेन्शन बंद करून समस्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करण्यात यावी.अशी मागणी जनकल्याण समाजन्नोती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री संतोष ताटीकोंडावार यांनी अहेरीचे तहसीलदार ओंकार ओंतरी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.