दैनिक आजचा लोकप्रश्न च्या अकोला आवृत्तीचा दणक्यात शुभारंभ -अल्पावधीच लोकप्रिय झाले दैनिक

0
140

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

मागच्या पाच महिन्यात पासून आपला देश कोरोनाशी लढत आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यापासून देशात लॉकडाऊनची परिस्थिती आद्यापही कायम आहे. यामुळे असंख्य उद्योग,व्यापार,कंपन्या अडचणी आल्या आहेत. आशा कठीण काळातही सर्व अकोला जिल्ह्यातुन दैनिक आजचा लोकप्रश्न या वृत्तपत्राच्या आवृत्तीस सुरुवात झाल्यामुळे अनेकांना उभारी मिळण्यासाठी हे प्रेरणादायीच ठरणार आहे.

ग्रामीण प्रश्नांना आजपर्यंत अनेक दैनिकात पाहिजे तसे महत्व दिल्या गेले नाही,मात्र अल्पावधीतच ग्रामीण प्रश्नांवर भर देत आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आजचा लोकप्रश्न या दैनिकाने केले. प्रथम परभणी जिल्ह्यातुन या दैनिकाची सुरुवात होऊ आज ह्या दैनिकाचा विस्तार मराठवाडा आणि विदर्भात झाला आहे. परभणी,हिंगोली, नांदेड,लातूर, वाशीम,अकोला,अमरावती असा या दैनिकाचा विस्तार आहे. दि.२८ जुलै रोजी आवृत्ती चा शुभारंभ अकोला जिल्ह्यात झाला. अकोल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ह्या दैनिकाचे वाचकांनी जोरदार स्वागत केले. जिल्ह्यात विविध मान्यवरांच्या हस्ते दैनिक आजचा लोकप्रश्न चे वाचन करून शुभारंभ करण्यात आला. तर दैनिक आजचा लोकप्रश्न हे दैनिक शून्यातुन उभे केलेले एक रोपटं आहे आणि यामाध्यमातून निश्चित सामान्य,उपेक्षित, गरजु लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल असा आत्मविश्वास शुभारंभ प्रसंगी आमदार अमोल मिटकरी
यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी उदघाटक आमदार अमोल मिटकरी, प्रमुख पाहुने अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले ,स्वागतोत्सुक मदन शेळके पाटील आवृत्ती संपादक, विनित जिल्हा प्रतिनिधी गोपाल नारे ,विशाल बोरे ,डॉ वानखेडे ,रविराज मोरे,यांची उपस्थिती होती.

(फोटो ओळी)

विविध मान्यवरांच्या शुभहस्ते दैनिक आजचा लोकप्रश्न च्या अकोला आवृत्तीचा शुभारंभ मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते करण्यात आला.