कोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती जिल्हयात आज 78 कोरोनामूक्त, नवीन 38 कोरोना बाधित

242

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली दि28जुलै
जिल्ह्यातील एसआरपीएफच्या 78 जवानांनी आज कोरोनावर एका वेळी यशस्वी मात केली. आज त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये काल रात्री उशिरा 2 व आज दुपारी 76 जवानांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले.
आज नवीन 38 कोरोना बाधितांमध्ये 33 पोलीस जवान असून यामध्ये रजेवरून परत आलेले व जिल्ह्याबाहेरील प्रवास केलेले व विलगीकरणात असलेल्या पोलिसांचा समावेश आहे. तसेच भामरागड येथील जिल्हा बाहेरून आलेले 2 पोलिस कोरोना बाधित आढळून आले आहेत. धानोरा पेंढरी येथील एक मजुर सोलापूर मधून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्याचे विलगीकरनात नमुने घेतले असता तोही कोरोना बाधित आढळून आला. तर काल रात्री वडसा व वाकडी गडचिरोली येथील एक एक कोरोना बाधित आढळून आले.

आज कोरोना बाधित – 38
आज कोरोनामूक्त- 78
जिल्हयातील एकूण कोरोनामुक्त – 233
सद्या सक्रिय कोरोना बाधित- 222
मृत्यू – 01
जिल्ह्यातील एकुण बाधित – 556